Electricity Problem: हिंगोली शहरातील मारवाडी गल्लीमध्ये नगरसेवकांच्या पाठपुराव्यामुळे नवीन डीपी बसवून वीज पुरवठा सुरळीत झाला. नागरिकांना आता वीज खंडित होण्याची समस्या नाही.
हिंगोली (Electricity Problem) : शहरातील प्रभाग क्रमांक 8 मधील मारवाडी गल्ली येथे बालाजी मंदिराशेजारील विजेच्या डीपीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तांत्रिक बिघाड निर्माण झाला होता. दिवसभरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे घरातील पंखे, कुलर, फ्रिज यांसारखी उपकरणे बंद पडत होती. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही परिणाम होत होता.
नागरिकांनी ही समस्या वारंवार नगरसेवक भरत चौधरी पहेलवान, नगरसेवक चंदू लव्हाळे आणि नगरसेवक पै. कपिल भैय्या खंडेलवाल यांच्या निदर्शनास आणून दिली होती. नागरिकांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेत तिघा नगरसेवकांनी वीज विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून समस्येचे गांभीर्य लक्षात आणून दिले.
नगरसेवकांच्या पाठपुराव्यानंतर वीज विभागाने तातडीने पावले उचलत सोमवारी रात्रीच्या सुमारास जुनी व नादुरुस्त डीपी काढून त्याजागी नवीन डीपी बसवली. हे काम आज पूर्ण करण्यात आले. नवीन डीपी बसवल्यामुळे परिसरातील वीज पुरवठा (Electricity Problem) आता सुरळीत झाला असून यापुढे वीज खंडित होण्याची समस्या उद्भवणार नाही, अशी माहिती वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. नगरसेवकांच्या या तत्परतेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून भरत चौधरी पहेलवान, चंदू लव्हाळे आणि पै. कपिल खंडेलवाल यांचे आभार मानले आहेत.