Marriage Sexual Assault: पोलिस स्थानक हद्दीतील एका गावातील तरुणी सोबत प्रेमाच्या आणाभाका घेत लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले नंतर पुढे सदर तरुणी सोबत विविध फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामी
आखाडा बाळापूर (Marriage Sexual Assault) : येथील पोलिस स्थानक हद्दीतील एका गावातील तरुणी सोबत प्रेमाच्या आणाभाका घेत लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले नंतर पुढे सदर तरुणी सोबत विविध फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामी केली. यामुळे याबाबत सदर तरूणीने आखाडा बाळापूर पोलिस स्थानकात धाव घेऊन तक्रार दिली. झिरोने याबाबत गुन्हा दाखल करून घटनास्थळ धाराशिव जिल्ह्यात येत असल्याने त्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा वर्ग केला असल्याचे पोलीस निरीक्षक शरद मरे यांनी सांगितले.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आखाडा बाळापूर पोलिस स्थानक हद्दीतील एका गावातील २४ वर्षीय तरुणी सोबत एका गावातील तरूणाने जुलै २०२६ ते १० ऑगस्ट २०२६ धाराशिव येथील बसस्थानक समोर लॉजमध्ये (Marriage Sexual Assault) लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. नंतर सदर तरुणी सोबतचे विविध फोटो व्हॉटस् अॅप स्टेटस वर , फोटो इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवून बदनामी केली. म्हणून त्या तरुणीच्या फिर्यादीवरून विविध कलमान्वये १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी झिरोने गुन्हा दाखल करून पोलीस स्टेशन आनंद नगर जिल्हा धाराशिव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा वर्ग करण्यात आला.