भानुप्रिया नामक युवतीने लग्न जुळविणार्या एजंट टोळीच्या माध्यमातून तब्बल पाच ते सहा तरुणांसोबत विवाह करुन सोन्याच्या दागीन्यांसह रोख रक्कम घेऊन पसार झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील युवकाची पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार
कळंब (Marriage Fraud Case) : तालुक्यातील शरद येथील २६ वर्षीय भानुप्रिया नामक युवतीने लग्न जुळविणार्या एजंट टोळीच्या माध्यमातून तब्बल पाच ते सहा तरुणांसोबत विवाह करुन सोन्याच्या दागीन्यांसह रोख रक्कम घेऊन पसार होत नवरदेव मुलाला लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
बेरोजगारीच्या या संकट काळात मुलांना विवाह योग्य मुली मिळणेही कठीण झाले आहे,या संधीचा फायदा घेत फसवणूक करण्याच्या हेतूने लग्न जुळविणारे एजंटचे रॅकेट सक्रीय झाले आहे. अशाच प्रकारे कळंब तालुक्यातील शरद येथील भानुप्रिया भाऊराव बनसोड (२६) हिने आतापर्यंत एकएक करीत पाच ते सहा मुलांसोबत लग्न केले. लग्न केलेल्या मुलांचे घरी पंधरा दिवस,महिनाभर राहायचं कुटूंबात विश्वास संपादन करुन एक दिवस पहाटे उठून घरातील सोन्याचे दागीने, रोख रक्कम गुंडाळून घरातील लोकांना समजण्या आधीच पोबारा करायचा,अशी हिची मोडसऑपरेंडी असल्याचे दिसून येते. अशाच प्रकारे सातारा जिल्ह्यातील बिजवडी येथील युवक विजय संजय भोसले (३०) यांचे सोबत एजंट च्या माध्यमातून भानुप्रिया हीचे सोबत २५ जुलै,२०२५ रोजी आळंदी (देवाची) येथे वरद विनायक मंगल कार्यालय येथे लग्न केले व बिजवडी येथे कुटूंबासोबत राहातं होते.
१२ आक्टोंबर २०२५ रोजी संजय कामानिमित्त मुंबई ला गेला होता.त्या रात्री जेवणखावण करुन संजय ची आई व पत्नी भानुप्रिया घरात झोपल्या होत्या,त्यानंतर पहाटे ५ वाजता सासूला जाग आला तेव्हा सून दिसून आली नाही.तिचा घराचे आजुबाजुला, गावात शोध घेतला पण सून आढळून आली नाही. त्यामुळे कुटुंबियांनी त्याचदिवशी सायंकाळी सातारा जिल्ह्यातील दहिवडी पोलीस स्टेशनला जाऊन सून हरविल्याबाबत तक्रार दिली. त्यापूर्वी भानुप्रिया हिचे मध्यप्रदेशातील जिल्हा खरगोज मोतीपुरा येथील मिस्त्री काम करणार्या राहुल संजय रजुरे यांचे सोबत २७ जानेवारी २०२५ रोजी लग्न केले.त्यालाही राहुल ने भानुप्रियाचे वडील गरीब आहे असे सांगितल्या ने एजंट अमोल वानखेडे समोर दीड लाख रुपये दिले त्यानंतर मंगळसुत्र, पायातल्या चांदीच्या पायपट्टी, सोन्याचे टाप्स,सोन्याचे झुमके,रोख रक्कम घेऊन मावशीची तब्येत खराब आहे असे सांगून दहा-पंधरा दिवसांनी येतो म्हणून गायब झाली, ती आलीच नसल्याने मध्यप्रदेश मंदिर खरगोज पोलीस स्टेशनला राहुल रजुरे ने तक्रार दिली.अशा प्रकारे भानुप्रियाने पाच ते सहा युवकांसोबत विवाह करुन लाखोंचा गंडा घातला असून पोलिसांना मात्र भानुप्रिया अजून गवसली नसल्याने समजते.