Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

आंतरराष्ट्रीय योग दिन

श्री शिवाजी महाविद्यालय, एसपीएम महाविद्यालय व शिवाजी हायस्कूलच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

International Yoga Day: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त स्थानिक शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय, एसपीएम महाविद्यालय आणि शिवाजी हायस्कूल, चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम


श्री शिवाजी महाविद्यालय एसपीएम महाविद्यालय व शिवाजी हायस्कूलच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

International Yoga Day |

चिखली (International Yoga Day) : १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त स्थानिक शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय, एसपीएम महाविद्यालय आणि शिवाजी हायस्कूल, चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आणि एनसीसी कॅडेट्सनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत योगाचे महत्त्व जाणून घेतले. हा कार्यक्रम १३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, खामगावचे कमांडिंग ऑफिसर कर्नल ओमेश शुक्ला, ट्रेनिंग जेसीओ मेजर रवण थापा, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पडोळे, एसपीएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष गव्हाणे तसेच शिवाजी हायस्कूलचे प्राचार्य डॉ. अनंतकुमार चेके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे आयोजन कॅप्टन शरद रावे, लेफ्टनंट किरण पडघान आणि फर्स्ट ऑफिसर सचिन वानखेडे यांनी केले. योगाचार्य म्हणून शिवाजी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. सचिन कोकडे उपस्थित होते. त्यांनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानाचे प्रात्यक्षिक करून योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

या (International Yoga Day) प्रसंगी तिन्ही शैक्षणिक संस्थांमधील एनसीसी कॅडेट्स तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. योगाभ्यासाद्वारे निरोगी जीवनशैलीचा संदेश देत सर्वांनी नियमित योग करण्याचा संकल्प केला.

कार्यक्रमास प्रा. डी. आर. उन्हाळे, डॉ. जी. एल. डोंगरे, डॉ. विजयश्री हेमंके, डॉ. सिद्धार्थ मेंढे, प्रा. पुनम वैद्य, संदीप गवळी, सुरेश सोळंके, वरखडे, मोहड, शीला खिल्लारे, पाटील यांच्यासह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी योग हा निरोगी आणि संतुलित जीवनाचा आधार असल्याचे प्रतिपादन करत आंतरराष्ट्रीय योग दिनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला.

Related to this topic: