Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

वीज कोसळून मृत्यू

रेगडी कन्नमवार जलाशय परिसरात वीज कोसळून एकाचा मृत्यू; तिघे जखमी

Lightning Strike Death: रेगडी येथील कन्नमवार जलाशयात बुधवारी वीजकोसळणामुळे एकाचा गम्भीर जखमी होऊन मृत्यू. तिघे जखमी झाले, नागरिकांनी मदत केले.


रेगडी कन्नमवार जलाशय परिसरात वीज कोसळून एकाचा मृत्यू तिघे जखमी

Lightning Strike Death |


मासेमारीसाठी गेलेल्या चौघांवर विजेचा घाला; झाडाखाली थांबणे ठरले जीवघेणे...

घोट (Lightning Strike Death) : चामोर्शी तालुक्यातील मौजा रेगडी येथील कन्नमवार जलाशय परिसरात बुधवारी (दि. १ जुलै) सायंकाळी साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसादरम्यान वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला, तर तिघेजण जखमी झाले.मिळालेल्या माहितीनुसार, विकासपल्ली येथील अखिल कालाचंद बिश्वास (वय ५५), दीपक बानिकांत बिश्वास, निर्मल हरिपद बिश्वास आणि चंद्रशेखर बिमल मंडल हे चौघेजण रेगडी येथील कन्नमवार जलाशयात मासेमारीसाठी गेले होते. त्याचवेळी परिसरात पाऊस सुरू झाला. पावसापासून बचाव करण्यासाठी ते एका झाडाखाली थांबले असता अचानक वीज कोसळली.

या (Lightning Strike Death) दुर्घटनेत अखिल कालाचंद बिश्वास हे गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र, रेगडी येथे दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेतून घोटकडे नेत असताना रेगडी–घोट मार्गावरील पोतेपल्लीजवळ वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत दीपक बानिकांत बिश्वास, निर्मल हरिपद बिश्वास आणि चंद्रशेखर बिमल मंडल हे जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र, रेगडी येथे उपचार सुरू आहेत. मृत अखिल बिश्वास यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, चामोर्शी येथे ठेवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. या दुर्दैवी घटनेमुळे विकासपल्ली व रेगडी परिसरात शोककळा पसरली आहे.

पावसाळ्यात घ्या खबरदारी
पावसाळ्यात विजांचा कडकडाट सुरू असताना नदी, तलाव, धरण परिसर तसेच मोकळ्या मैदानात जाणे टाळावे. विशेषतः झाडाखाली आश्रय घेणे धोकादायक ठरू शकते. अशा वेळी सुरक्षित इमारतीत किंवा बंदिस्त ठिकाणी थांबावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Related to this topic: