Gambling Den Raid: कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा पोलीस चौकी अंतर्गत जवळा पांचाळ शिवारातील शेतातील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून ३८ हजार ५०० रूपये
आखाडा बाळापूर (Gambling Den Raid) : कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा पोलीस चौकी अंतर्गत जवळा पांचाळ शिवारातील शेतातील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून ३८ हजार ५०० रूपये मुद्देमाल जप्त करून ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, पोलिस निरीक्षक शरद मरे मार्गदर्शनाखाली डोंगरकडा पोलीस चौकी संतोष नागरगोजे, विठ्ठल जाधव, होमगार्ड पथकाने जवळा पांचाळ शिवारातील जुगार अड्ड्यावर १७ ऑगस्ट सायंकाळी छापा टाकला यात रोख रक्कम ५५०० व इतर मुद्देमाल असा ३८५०० मुद्देमाल जप्त करून पोलिस कर्मचारी विठ्ठल जाधव फिर्यादीवरून संतोष नागोराव जाधव,जलील लानीमीया पठाण, गुणाजी लक्ष्मण जाधव ,रर्ईस खान शेखखान पठाण,मतीन रहीम खान पठाण , सुरेश दशरथ जाधव रा.जवळापांचाळ विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे असं पोलिस जमादार संतोष नागरगोजे यांनी सांगितले.
मुरूंबा शिवारात झन्ना मन्ना जुगारावर छापा
हिंगोली : वसमत तालुक्यातील मुरूंबा शिवारातील भगवान साहेबराव कदम यांच्या शेत गट नं. १३३ मधील शेतातील एका झोपड्यामध्ये झन्ना मन्ना जुगार सुरू असताना १७ ऑगस्टला वसमत ग्रामीण पोलिसांनी छापा मारला. घटनास्थळी नगदी १५२० रुपये जप्त करण्यात आले. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिसात पोलिस उपनिरीक्षक एकनाथ डक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुरज किशन कदम, शाम दामोदर पावडे, गोविंद नामदेव वारे, अविनाश सुभाष कसारे, गजानन नारायण वारे सर्व रा. मुरूंबा ता. वसमत शेख खालेद शेख खादर रा. सम्राट कॉलनी वसमत या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोउपनि मिरासे हे करीत आहेत.