Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

कोरची पोलिस कारवाई

कोरची पोलिसांची धडक कारवाई; 7 लाखांचा अवैध दारू साठा जप्त, XUV सह मुद्देमाल ताब्यात

Korchi Police Action: कोरची पोलिसांनी महिंद्रा XUV गाडीचा सहसा जप्त करून 7 लाख रुपयांचा अवैध दारू साठा ताब्यात आणला. वाहन चालक पळत गेल्यानंतरही पोलीसांकडे मुद्देमाल आढळला.


कोरची पोलिसांची धडक कारवाई 7 लाखांचा अवैध दारू साठा जप्त xuv सह मुद्देमाल ताब्यात  

Korchi Police Action |

 

गुप्त माहितीवरून मसोली फॉरेस्ट नाक्यावर नाकाबंदी; चालक पसार, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

कोरची (Korchi Police Action) : अवैध दारू वाहतुकीला आळा घालण्यासाठी कोरची पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत 7 लाख रुपयांचा अवैध दारू साठा व वाहतुकीसाठी वापरलेली XUV गाडी जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 22/06/2026 रोजी देवरी मार्गे मसोली ते कोरची मार्गाने पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून अवैध दारू वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मसेली फॉरेस्ट नाका येथे नाकाबंदी करण्यात आली. 

पोलिसांना (Korchi Police Action) पाहताच संशयित वाहनचालकाने वाहन कॅनाल रोडकडे वळवून पळ काढला. पोलीस पाठलाग करत असतानाच चालकाने महिंद्रा XUV 500 गाडी क्रमांक MH-25 R-8499 तिथेच सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला.  गाडीची झडती घेतली असता काळ्या कपड्याखाली लपवून ठेवलेल्या 10 खड्यांच्या बॉक्समध्ये गोवा बनावटीच्या व्हिस्कीच्या 1000 सिलबंद बाटल्या आढळून आल्या. 2 लाख रुपये किमतीचा दारू साठा व 5 लाख रुपये किमतीची गाडी असा एकूण 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये कोरची पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सपोनि मुकुंद देशमुख करत आहेत. ही कारवाई SP एम. रमेश, अप्पर SP गोकुळराज, अप्पर SP कार्तिक, SDPO रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. शैलेंद्र ठाकरे, सपोनि मुकुंद देशमुख व त्यांच्या पथकाने केली.

Related to this topic: