Rajaram Patil passes away: तालुक्यातील देवणी (खुर्द) येथील रहिवासी राजाराम गंगाराम पाटील यांचे दि. 6 जुलै रोजी दुःखद निधन झाले. 7 जुलै रोजी राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थिती
देवणी (Rajaram Patil passes away) : तालुक्यातील देवणी (खुर्द) येथील रहिवासी राजाराम गंगाराम पाटील यांचे दि. 6 जुलै रोजी दुःखद निधन झाले. 7 जुलै रोजी राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राजाराम पाटील (Rajaram Patil) यांच्या सरकार निस्वार्थ कार्यकर्ता पुन्हा होणे नाही, अशा शब्दात भारतीय किसान युनियनचे प्रदेश प्रवक्ता राजकुमार सस्तापुरे यांनी यावेळी श्रद्धांजली वाहिली.
राजाराम पाटील (Rajaram Patil) हे 1980 पासून शेतकरी नेते शरद जोशी यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी चळवळीत काम करीत होते. गेल्या 45 वर्षांपासून अहोरात्र त्यांनी चळवळीसाठी काम केले. देशभरातील अनेक आंदोलनात, मेळ्यात, जेलमध्ये आपला सहभाग नोंदवला. निस्वार्थ भावनेने गाव गावात पायी फिरून शेतकरी संघटनेचे विचार पेरण्याचे काम केले शेतकरी चळवळीतला एक अनमोल हिरा गेला, अशा भावना राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. राजाराम पाटील याची शरद जोशींवर व त्यांच्या विचारांवर एवढा दृढ विश्वास होता की, मुलाचे नाव शरद तर मुलीचे नाव आंदोलना ठेवले आहे.
अंत्यविधीला भारतीय किसान युनियनचे प्रदेश प्रवक्ता राजकुमार सस्तापुरे, शेतकरी संघटनेचे माजी आमदार शिवराज तोंडचिरकर, माजी आमदार धर्माजी सोनकवडे, काँग्रेस नेते दिलीप पाटील नागराळकर, बाजार समितीचे सभापती सदाशिव पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजित बेळकुणे, भारतीय किसान मोर्चाचे बीडचे अध्यक्ष अच्युत गंगणे, शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे, राजेंद्र मोरे, शेतकरी नेते लक्ष्मणराव वंगे, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुणदादा कुलकर्णी, अशोक पाटील, रुपेश शंके, बालाजी अडसूळ, नवनाथ शिंदे, अनिल इंगोले, अनिल कांबळे, लक्ष्मणराव रणदिवे, मनोहर पाटील, रामराव म्हेत्रे यांच्यासह राज्यभरातील हजारोच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.