Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ

आमदार बी. टी. देशमुख

सिन्हा महाविद्यालयात माजी आमदार बी. टी. देशमुख यांना श्रद्धांजली

MLA B. T. Deshmukh: अमरावतीत डॉ.एच.एन. सिन्हा महाविद्यालयात माजी आमदार बी.टी.देशमुख यांचा निधनानंतर शोक व्यक्त करून श्रद्धांजलि अर्पित करण्यात आली.


सिन्हा महाविद्यालयात माजी आमदार बी टी देशमुख यांना श्रद्धांजली

MLA B. T. Deshmukh |

पातूर (MLA B. T. Deshmukh) : श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीद्वारे संचालित डॉ. एच. एन. सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालय, पातूर येथे माजी आमदार बी. टी. देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण एस. खंडारे उपस्थित होते.

यावेळी वक्त्यांनी बी. टी. देशमुख (MLA B. T. Deshmukh) यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील झुंजार, अभ्यासू आणि लढवय्ये लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी १९८० ते २०१० या कालावधीत अमरावती पदवीधर मतदारसंघाचे सलग पाच वेळा प्रतिनिधित्व केले. शिक्षक, पदवीधर आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना त्यांनी सातत्याने विधान परिषदेत वाचा फोडली.

नागपूर विद्यापीठ शिक्षक संघटना (नुटा) च्या माध्यमातून त्यांनी विदर्भातील शिक्षक व पदवीधरांच्या प्रश्नांसाठी महत्त्वपूर्ण लढे दिले. शिक्षण, उद्योग, व्यापार आणि सिंचन क्षेत्रातील त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे ते जनसामान्यांचे नेते म्हणून प्रसिद्ध झाले. विदर्भातील सिंचन अनुशेषाचा प्रश्न प्रभावीपणे मांडल्यामुळे त्यांना ‘विदर्भाच्या सिंचन अनुशेषाचे जनक’ म्हणूनही ओळखले जाते.

प्राचार्य डॉ. किरण खंडारे यांनी श्रद्धांजलीपर भाषणात बी. टी. देशमुख (MLA B. T. Deshmukh) यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करत त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे सांगितले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी दोन मिनिटे मौन पाळून दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.