Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी

रेगडी-हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अभिवादन

Dr. Shyama Prasad Mukherjee: रेगडी-हळदवाही जिल्ह्यातील विविध भाजप बूथांवर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जीच्या पुण्यतिथीसाठी अभिवादन करून त्यांचे कामकाज समर्पित केले गेले.


रेगडी-हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रात डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अभिवादन

Dr. Shyama Prasad Mukherjee |

घोट (Dr. Shyama Prasad Mukherjee) : रेगडी-हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रातील हळदवाही व रेगडी पंचायत समितीअंतर्गत विविध बूथवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. पक्षाच्या आदेशानुसार भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेशभाऊ बारसागडे यांच्या मार्गदर्शनाखाली, गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या नेतृत्वात तसेच भाजप बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी श्यामनगर, सिमूनतला, मंजेगाव, हळदवाही, मुधोली, मच्छली, चापलवाडा, मकेपल्ली, रेगडी, विकासपल्ली आणि पलासपूर या गावांतील विविध बूथवर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला विविध गावांतील भाजप कार्यकर्ते, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी (Dr. Shyama Prasad Mukherjee) यांच्या राष्ट्रसेवा, विचार आणि कार्याचा आढावा घेत त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले.

Related to this topic: