Asola Road Repair: कारपा पांदण रस्त्याची लांबशेळीच्या वर्यांनी दुरुस्तीअभावामुळे शेतकऱ्यांना धोकादायक बनलेला असल्याने त्याची तात्काळ दुरुस्ती मागणी झाली आहे.
मानोरा (Asola Road Repair) : तालुक्यातील आसोला खु. ते कारपा पांदण रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे. याबाबत शेतकरी युवराज राठोड यांनी उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग मानोरा यांना तात्काळ रस्ता दुरुस्ती करण्याचे निवेदन दिले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित रस्ता अनेक वर्षांपासून दुरुस्तीअभावी खराब झाला (Asola Road Repair) असून पावसाळ्यात परिस्थिती अधिक बिकट होते. रस्त्यालगत पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्यांची व्यवस्था नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचून राहते. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होऊन शेतकऱ्यांना शेतात जाणे धोकादायक ठरणार आहे. तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडे, झुडपे आणि गवत वाढल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होणार आहे.
अनेक ठिकाणी रस्ता अरुंद (Asola Road Repair) झाला असल्याने वेळेवर शेतात पोहोचता न आल्यामुळे पेरणी, फवारणी व इतर शेतीकामांवर परिणाम होणार आहे. शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्त्याची तात्काळ पाहणी करून आवश्यक ठिकाणी बंधारे व दोन्ही बाजूंनी नाल्यांची उभारणी करावी, रस्त्यावरील झाडे-झुडपे हटवून रस्ता रुंदीकरण करावे आणि पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे. येत्या १५ जून पूर्वी काम पूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांना उपोषण व रास्ता रोको आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही निवेदनातून सबंधित विभागाला दिला आहे.