Mali Youth Organization: उमरा गावचे प्रसिद्ध समाजसेवक आणि महाराष्ट्र माळी युवक संघटना (अकोला) चे जिल्हा सचिव विलास हरमकार यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षीही अविरत सामाजिक सेवा राबवण्यात आली.
पातूर (Mali Youth Organization) : उमरा गावचे प्रसिद्ध समाजसेवक आणि महाराष्ट्र माळी युवक संघटना (अकोला) चे जिल्हा सचिव विलास हरमकार यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षीही अविरत सामाजिक सेवा राबवण्यात आली. या उपक्रमाचा एक भाग म्हणून अकोला येथील जिल्हा रुग्णालयामध्ये गरजू आणि गरीब रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान करण्यात आले. या अत्यंत कौतुकास्पद अशा (Mali Youth Organization) सामाजिक उपक्रमासाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रकाशभाऊ, भाऊ तायडे, अकोला शहर अध्यक्ष महेंद्र गवई, ॲड. विष्णू इंगळे आणि प्राध्यापक निलेश अमोल राऊत सर यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
या अन्नदान कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी धिरेंद्र पायघन सर, उमेश गवई, रोहन इंगळे, हरिदास इंगळे, गजानन बुंधे यांच्यासह विलास हरमकार यांच्या सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. "समाजातील वंचित आणि गरजू घटकांना मदत करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. यापुढेही लोकांच्या सेवेसाठी असेच विविध सामाजिक उपक्रम अविरतपणे राबवले जातील," असा संकल्प याप्रसंगी विलास हरमकार यांनी व्यक्त केला. (Mali Youth Organization) संघटनेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.