Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

बस दागिने चोरी

गर्दीचा फायदा घेऊन बसमधील प्रवाशाचे लांबविले दागिणे

Bus Stealing Jewelry: वाशिम जिल्ह्यातील बसमध्ये चोरट्यांनी प्रवाशाच्या बॅगमधून २ लाख ८० हजार रुपयाचे दागिणे चोरून नेले. आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.


गर्दीचा फायदा घेऊन बसमधील प्रवाशाचे लांबविले दागिणे

Bus Stealing Jewelry |

आखाडा बाळापूर (Bus Stealing Jewelry) : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील एकजण मालेगाव ते आखाडा बाळापूर मार्गावरून बसमध्ये जात असताना अज्ञात चोरट्यांनी एका प्रवाशाच्या बॅग मधील २ लाख ८० हजार रुपयाचे सोन्याचे दागिणे लांबविल्याने आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील गणेश शिंदे हे कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील शिक्षक कॉलनीमध्ये वास्तव्यास राहतात. गावाकडे काम असल्यामुळे शिंदे हे आपल्या कुटूंबीयासह मालेगाव येथे गेले होते. शनिवारी २५ एप्रिलला दुपारच्या सुमारास अकोला ते नांदेड या बसमध्ये मालेगाव येथून बसले होते. यावेळी बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती. या (Bus Stealing Jewelry) गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेऊन मालेगाव ते आखाडा बाळापूर दरम्यान त्यांच्या बॅगमधून १ लाख ४० हजार रुपयाचे १ तोळ्याचे सोन्याचे गंठण आणि १ लाख ४० हजार रुपयाचा ५ ग्रॅम सोन्याचे मनी व ५ ग्रॅमचे सोन्याचे पेंडॉल असा एकुण २ लाख ८० हजार रुपयाचा ऐवज चोरून नेला.

आखाडा बाळापूर येथे शिंदे कुटूंबीय घरी आल्यावर त्यांनी बॅगची पाहणी केली असता त्यात दागिणे दिसून आले नाही. त्यांनी तात्काळ आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन रितसर तक्रार दिली. ज्यामध्ये २ लाख ८० हजार रुपयाचे दागिणे चोरीस गेल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास जमादार जोगदंड हे करीत आहेत.

Related to this topic: