Mahila Handa Morcha: माळसेलू येथील महिलांनी जलजीवन मिशन योजनेतील पाणी पुरवठा बंद असल्याने जिल्हा परिषदेवर हंडा मोर्चा काढून निवेदन दिले.
हिंगोली (Mahila Handa Morcha) : तालुक्यातील माळसेलू येथील जलजीवन मिशन योजनेचा पाणी पुरवठा बंद असल्याने संतप्त झालेल्या महिलांनी बुधवारी जिल्हा परिषदेवर हंडा मोर्चा काढून आपल्या भावना व्यक्त केल्या.
माळसेलू येथील जलजीवन मिशन योजनेचा पाणी पुरवठा बंद असल्याने १ एप्रिल रोजी संतप्त महिलांनी जिल्हा परिषद कार्यालयावर (Mahila Handa Morcha) हंडा मोर्चा काढून जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांना निवेदन दिले. माळसेलू येथे जलजीवन मिशन योजनेतंर्गत १ कोटी ७९ लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे. यामध्ये १ कोटी ३३ लाख ६६ हजार रुपये निधी ४ हप्त्यामध्ये वितरीत करण्यात आलेला आहे. अद्यापर्यंत योजनेचे काम पुर्णत्वाला गेले नसुन योजनेमध्ये खोली अंदाजपत्रका नूसार केलेले नाही. या संदर्भात अनेक वेळा निवेदन देऊनही त्याची शहानिशा जायमोक्यावर जाऊन कोणताही पंचनामा करण्यात आला नाही.
ऐवढचे नव्हे तर अधिकारी व कर्मचार्यांनी जागेवर बसूनच खोटा व बनावटी अहवाल दाखल केला आहे. याच योजनेतंर्गत थोर जवळा येथे खोदण्यात आलेल्या विहिरीला पाणी लागले नाही, एवढेच नव्हे तर या ठिकाणी पाण्याची ७ दिवस चाचणी करणे अंदाज पत्रकानुसार बंंधनकारक असताना देखील ती चाचणी देखील कागदोपत्री दाखविण्यात आली आहे. सध्या एप्रिल महिना सुरू झाला असुन याच दिवसामध्ये विहिरीमध्ये पाणी नाही, त्यामुळे भविष्यातील दोन महिने कसे भागवावे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची व सांडपाण्याची व्यवस्था नाही, त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावात जलजीवन मिशन योजनेतंर्गत पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना कंत्राटदारास द्याव्यात त्याने वेळेत पाणी पुरवठा सुरू न केल्यास त्याचे नावे काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी करून या प्रश्नी आमरण उपोषण केले जाईल असा इशारा देण्यात आला. या (Mahila Handa Morcha) निवेदनावर अनिल नायक, शाम वामन, मनोहर वामन, देवानंद भिसे, भिमराव भिसे, संतोष भिसे, जगन वामन, राहुल भिसे, अशोक भिसे, तुकाराम वामन यांच्यासह आदींच्या स्वाक्षर्या आहेत.