Right to Information Act: गडचीरोलीत लोक आंदोलन न्यास यांनी जागृतता करीत असताना माहिती अधिकारी कायद्याच्या नवीन दुरुस्त्यांविरोधात राजस्थान भरभरून आंदोलने उभारण्यात येणार
गडचिरोली (Right to Information Act) : माहितीचा अधिकार कायद्यात करण्यात आलेल्या दुरुस्त्या व नव्या तरतुदींविरोधात राज्यभर जनजागृती व आंदोलन उभारण्यात येणार असल्याची माहिती लोक आंदोलन न्यास, राळेगणसिद्धीच्या कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांनी दिली.त्या म्हणाल्या की, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे ५ जुलै २०२६ रोजी या दुरुस्त्यांच्या निषेधार्थ उपोषणास बसणार आहेत. माहितीचा अधिकार कायदा अस्तित्वात आणण्यासाठी त्यांनी २००२, २००३ व २००६ मध्येही उपोषणे केली होती.
तसेच राज्यभर तालुका व जिल्हास्तरावर जनजागृती दौरे काढून या कायद्याबाबत व्यापक जनजागृती केली होती.इनामदार यांनी सांगितले की, माहिती अधिकार कायद्यातील दुरुस्त्यांविरोधात कायदेशीर लढा देण्यासाठी न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.गडचिरोली येथील झालेल्या बैठकीस लोक आंदोलन न्यासचे राष्ट्रीय खजिनदार दत्ताभाऊ आवारी, विश्वस्त अन्सार शेख,गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे, नागपूर विभागाध्यक्ष चंद्रशेखर भडांगे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी भारत स्वाभिमान पतंजली योगपीठचे जिल्हाध्यक्ष अशोक पोरेडीवार,प्रकाश ताकसांडे,ॲड. विनय चाटे, सिद्धार्थ गोवर्धन,सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक प्रकाश भोयर,प्रा. सी. के. कांबळे,वामन भोयर आदी मान्यवर उपस्थित होते.