Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

डोंगरगाव टँकर अपघात

डोंगरगाव पुलाजवळ टँकरच्या धडकेत महिला व बैलाचा मृत्यू, दुसरा बैल गंभीर जखमी

Dongargaon tanker accident: महामार्गावर डोंगरगाव पुलाजवळ टँकरने महिलेच्या आणि दोन बेल्यांची गंभीर हत्या झाली. अपघातामुळे महिला व एक बेला जागीच ठार होता तर दुसरा बेला गंभीर जखमी होईल.


डोंगरगाव पुलाजवळ टँकरच्या धडकेत महिला व बैलाचा मृत्यू दुसरा बैल गंभीर जखमी

Dongargaon tanker accident |

आखाडा बाळापूर (Dongargaon tanker accident) : कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पुल महामार्गावर भरधाव वेगातील टँकरने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिला व एक बैल जागीच ठार झाला, तर एक बैल गंभीर जखमी झाला.

मंगळवारी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास हिंगोलीकडून नांदेडकडे जाणाऱ्या MH-26 F D 0939 या टँकरने डोंगरगाव पुल गावाजवळ महामार्गावरून शेतातून बैलांना चारून घराकडे परतणाऱ्या महिलेला पाठीमागून धडक दिली. यात संगीता किसन नरवाडे (वय 47 वर्षे) व एक बैल जागीच ठार झाला, तर एक बैल जखमी झाला, अशी माहिती बीट प्रमुख राजेश घोंगडे यांनी दिली.

अपघाताची (Dongargaon tanker accident) माहिती मिळताच पोलिस निरीक्षक शरद मरे, पोलिस उपनिरीक्षक सुनील रोहिणकर, गजानन राठोड, सागर वाढोणकर, अरविंद जाधव, विठ्ठल जाधव, परमेश्वर सरकटे व महामार्ग पोलिस पथकातील येळकीचे पोलिस उपनिरीक्षक साईनाथ अनमोड, सहायक पोलिस उपनिरीक्षक शेषराव पोले, सय्यद तयब अली, गजानन आगलावे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस व महामार्ग पोलिस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला केले व महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.