Falsely Threatening Case: महिला सीमा सुशिल वाघमारे यांनी आपल्या शेजाऱ्याला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देणाऱ्याविरुद्ध पुलिसात तक्रार दाखल केली आहे.
मानोरा (Falsely Threatening Case) : खोट्या केसेस मध्ये अडकविण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रकरणी फिर्यादी महीला सौ सीमा सुशिल वाघमारे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शहरातील वसंतनगर येथील रहिवासी आरोपी पती व पत्नीविरुद्ध अदखल पात्र गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार वसंतनगर मानोरा येथे माझ्या घराच्या शेजारी भाड्याने राहत असलेले आरोपी अमर निळकंठ हा दि. २६ मार्च रोजी ४.३० वाजताच्या सुमारास घरासमोरून गाडी रेस करून जात पाहिले असता त्याने मला व माझ्या शेजारी असलेल्या शारदा राऊत यांना पाहून एखाद्याला खोट्या केसेस मध्ये अडकवितो. तसेच त्याची पत्नी शारदा निळकंठ ही आमच्याकडे पाहून आम्हाला शिवीगाळ (Falsely Threatening Case)करते. व एखादे दिवशी तुमच्या घरच्याना विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकविते अशी धमकी देते.
सदरील आरोपीपासून माझ्या पतीला, मुला बाळाला व कुटुंबाला धोका निर्माण झाला आहे. अश्या आशयाच्या महिलेच्या जबानी रिपोर्टवरून पोलिसांनी आरोपी पती व पत्नीविरुद्ध अदखल पात्र गुन्हा दाखल केला आहे. (Falsely Threatening Case) घटनेचा अधिक तपास टाऊनचे अंमलदार दिलीप चव्हाण हे करीत आहे.