Breaking News
  • 'जगाच्या नकाशावर राहायचं की इतिहासजमा व्हायचं?'; पाकिस्तानला लष्करप्रमुखांचा थेट इशारा
  • यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची बदली
  • अमरावती महानगरपालिकेच्या अधिकृत ओपन स्पेसवर बांधलेली जनावरे जप्त
  • बुलढाण्यात पोलिसांच्या सतर्कतेने बालविवाह रोखला
  • दिवे घाटात दहशत पसरवणाऱ्या बुलेट राजांचा माज पोलिसांनी मोडला!
  • शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट
  • CBI कडून शुभम खैरनारच्या संपर्कातील लोकांची देखील चौकशी
  • रत्नागिरी- जिल्ह्यात CNG GAS चा मोठ्या प्रमाणात तुटवडा
  • मांडवा ते गेट वे प्रवासी जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार;प्रवाशांच्या सुरक्षेसाठी घेतला निर्णय

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

महावितरण विद्युत रोहित्र

विद्युत रोहित्राला दिला जातोय कुलरचा गारवा; महावितरणचा उन्हाळी उपाय

Mahavitaran Vidyut Rohitra: हिंगोलीत वाढत्या उष्णतेमुळे रोहित्रांवर ताण वाढल्याने महावितरणने विद्युत उपकेंद्रातील रोहित्रांना कुलरद्वारे थंडावा देण्याचा उपाय शोधला


विद्युत रोहित्राला दिला जातोय कुलरचा गारवा महावितरणचा उन्हाळी उपाय

Mahavitaran Vidyut Rohitra |

 

एसी, कुलर फक्त मानसासाठी नव्हे तर रोहित्रासाठीही
१८० मेगावॅटचा ताण महावितरणने शोधला थंडगार उपाय

सुधीर गोगटे
हिंगोली (Mahavitaran Vidyut Rohitra) :
जिल्ह्यात तापमानाचा पारा ४३ अंशांवर पोहोचला असून वाढत्या उष्णतेमुळे विजेची मागणी विक्रमी पातळीवर गेली आहे. एसी, कुलर, पंख्यांच्या वाढत्या वापरामुळे रोहित्रांवर अतिरिक्त ताण येत आहे. या पार्श्वभूमीवर विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणने अनोखा उपाय शोधला आहे – वीज उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरला थेट कुलरचा गारवा देण्यात येत आहे.

सध्या हिंगोली जिल्ह्यात विजेची मागणी १८० मेगावॅटच्या पुढे गेली आहे. दिवसेंदिवस वाढणार्‍या तापमानामुळे रोहित्र गरम होऊन त्यांची कार्यक्षमता कमी होते. काही वेळा ओव्हरलोडमुळे रोहित्र जळण्याचे प्रकारही घडतात. परिणामी अघोषित वीज कपात होऊन नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. हीच बाब लक्षात घेऊन महावितरणने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील प्रमुख वीज उपकेंद्रांवर मोठे कुलर बसवले आहेत.

हिंगोली शहर, वसमत, कळमनुरी, सेनगाव येथील ३३/११ केव्ही उपकेंद्रांमधील पॉवर ट्रान्सफॉर्मरजवळ हे कुलर लावण्यात आले आहेत. (Mahavitaran Vidyut Rohitra) कुलरमधून येणार्‍या थंड हवेमुळे रोहित्रांचे तापमान ८ ते १० अंशांनी कमी होत असल्याचा दावा महावितरणच्या अभियंत्यांनी केला आहे. तापमान नियंत्रणात राहिल्याने रोहित्रांची कार्यक्षमता वाढते व बिघाड होण्याचे प्रमाण कमी होते. महावितरणचे अधीक्षक अभियंता म्हणाले, 'उन्हाळ्यात विजेची मागणी ३० टक्क्यांनी वाढली आहे. रोहित्र सतत गरम राहिल्यास इन्सुलेशन खराब होऊन मोठा बिघाड होऊ शकतो. कुलरमुळे रोहित्र थंड राहत आहेत. हा प्रयोग यशस्वी ठरत असून इतर उपकेंद्रांवरही कुलर बसवण्याचे नियोजन आहे.या उपक्रमामुळे ऐन उन्हाळ्यात वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटनांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कुलरचा खर्च तुलनेने कमी असून रोहित्र दुरुस्तीचा लाखो रुपयांचा खर्च वाचणार आहे. याशिवाय महावितरणकडून नागरिकांना वीज बचतीचे आवाहनही करण्यात आले आहे. एसी २४ अंशांवर ठेवणे, अनावश्यक दिवे-पंखे बंद ठेवणे यामुळे यंत्रणेवरचा ताण कमी होईल, असे महावितरणने कळवले आहे.

हिंगोली जिल्ह्यात महावितरणचे ७२ विज उपकेंद्र

हिंगोली जिल्ह्यातील विज ग्राहकांना सुरळीत विज पुरवठा मिळावा या उद्देशाने जिल्हाभरात वेगवेगळ्या ठिकाणी उपकेंद्र उभारण्यात आले आहे. ज्यामध्ये हिंगोली तालुक्यात लिंबाळा सब स्टेशन, लोहगाव, आडगाव, नर्सी नामदेव, खटकाळी, यशवंत नगर, खानापूर चित्ता, खडकद, पांगरी, पेडगाव, बासंबा, खाकीबाबा, समगा, कानडखेडा, कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी, सांडस, गौळबाजार, आखाडा बाळापूर, साळवा, वारंगा फाटा, डोंगरकडा, सुकळी, सुकळीवीर, दाती, पोत्रा, जवळा पांचाळ, लमानदेव, मसोड, वसमत तालुक्यातील वसमत (खांडेगाव रोड), गिरगाव, पारडी बागल, कुरूंदा, वापटी, वाईचोंडी, माळवटा, बोराळा, वसमत, वाखारी, जेएनव्ही सब स्टेशन, चौंडी, खांडेगाव, सातेफळ, हयातनगर, बोरीसावंत, हट्टा, कौठा रोड, नहाद, गुंंडा, सेलू, पार्डी खु.,  पळशी, औंढा नागनाथ तालुक्यातील औंढा नागनाथ, मेथा, बोरजा, टेबुंरदरा, शिरडशहापूर, जवळा बाजार, सिध्देश्वर, रामेश्वर, साळणा, रुपूरतांडा, सेनगाव तालुक्यातील खिल्लार, पानकनेरगाव, जयपुर, कडोळी, हत्ता पाटी, घोरदरी, गोरेगाव, आजेगाव, सेनगाव, जवळा बि.के., पुसेगाव, या ठिकाणी ३३ केव्ही विज उपकेंद्र उभारण्यात आले आहे.

विज ग्राहकांनी विजेचा जपुन वापर करावा- अधिक्षक अभियंता राजेसिंग चव्हाण

एकीकडे उन्हाळ्यात विजेची मागणी अधिक वाढली आहे. अशा परिस्थतीत (Mahavitaran Vidyut Rohitra) महावितरणचे अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र विजपुरवठा सुरळीत राहावा या उद्देशाने प्रयत्न करीत आहेत. सध्या तापमान ४३ अंशावर पोहचले आहे. त्यामुळे विजपुरवठा कुठेही खंडीत होवू नये यासाठी प्रत्येक विज उपकेंद्रावर कुलर बसविण्यात आले आहे. नागरिकांनी विजेचा वापर करावा असे आवाहन महावितरणचे अधिक्षक अभियंता राजेसिंग चव्हाण यांनी केले आहे.

Related to this topic: