Mahavitaran Centres: परभणीच्या सेलू तालूक्यात झालेल्या वादळी वा-यामूळे शेतीसह घरांच्या पत्र्यांचे नूकसान झाले तर महावितरणच्या उपकेंद्रांतून विद्यूत पूरवठ्या अभावी
जबाबदार अभियंते व कर्मचारी नाँटरिचेबल
परभणी/ सेलू (Mahavitaran Centres) : परभणीच्या सेलू तालूक्यात झालेल्या वादळी वा-यामूळे शेतीसह घरांच्या पत्र्यांचे नूकसान झाले तर महावितरणच्या उपकेंद्रांतून विद्यूत पूरवठ्या अभावी तालू्क्यातील बहूतांश गावात नागरीकांना रात्र अंधार काढावी लागली.बूधवार १३ मे रोजी तालूक्यात दूपारी ३ च्या वेळी वादळी वारे तर काही ठिकाणी आवकाळी पावसामूळे विद्यूत तारांवर झाडे पडल्यामूळे तांत्रीक बिघाड झाली होती.
दरम्यान महावितरणच्या वतिने विद्यूत पूरवठा सूरळीत करण्यासाठी कूठलीही प्रभावी यंत्रना राबविली गेली नसल्यामूळे काही उपकेंद्रातील विद्यूत पूरवठा सूरळीत करण्यात आला नाही त्यामूळे नागरीकांना रात्र अंधार काढावी लागली.तर महावितरणचे अभियंते व कर्मचारी मोबाईल बंद करून बसले होते.नागरीक संबधित उपकेंद्राच्या भ्रमणध्वनीवर संपर्क करत असतांना त्यांचा भ्रमणध्वनी नाँटरिचेबल होता.दरम्यान सदरिल अधिकारी, कर्मचारी हे जबाबदारी झटकून काम करत असल्याने नागरीकात तिव्र नाराजी पसरली आहे.
पाऊस थेंबभर लाईट नाही रात्रभर
तालूक्यात मागील अनेक दिवसापासून (Mahavitaran Centres) विद्यूत पूरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.अनेक वेळा विद्यूत पूरवठा खंडीत होतो.तालूक्यात विजेचा प्रश्न गंभीर बनला आहे.दरम्यान या सर्व बाबीकडे महावितरणचे अधिकारी व कर्मचारी दूर्लक्ष करत असल्याचा प्रकार सूरू आहे.शहरातील फ्यूज काँल सेंटरचा संपर्क नंबर असो का तालूक्यातील उपकेंद्राचा संपर्क नंबर तसेच संबधित उपविभागीय कार्यकारी अभियंता यांच्यासह उपकेंद्राचे अभियंते व लाईन स्टाफ यांचे देखील संपर्क नंबर अनेकवेळा नाँटरिजेबल असतात.
तर मागील अनेक वर्षापासून दूरूस्तीची कामे केवळ थातूरमातूर केली जात असल्याने वेळोवेळी फाँल्ट होतात.तसेच विद्यूत तारा तूटून विद्यूत पूरवठा खंडीत होतो.मात्र ही दूरूस्तीची कामे करणा-या कंत्राट कंपन्यावर योग्य कारवाही होणे गरजेचे आहे.तालूक्यात मागील अनेक दिवसापासून थोडा पाऊस पडला किंवा वारे आले तर रात्रभर विद्यूत पूरवठा खंडीत होत असल्याने पाऊस थेंबभर लाईट जाते रात्रभर अशी परिस्थीती तालूक्यात आहे.