Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > अमरावती

अखंडित विजेसाठी वीजबिल भरा”: महावितरण

महावितरणची धडक कारवाई…२७ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

वीजबिलाची थकबाकी शून्य करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या वसूली मोहिमेला महावितरणने अधिक गती दिली असून, प्रतिसाद न देणाऱ्या तब्बल २७ हजार थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.


महावितरणची धडक कारवाई…२७ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

Mahavitaran Action |

अमरावती (Mahavitaran Action) : वीजबिलाची थकबाकी शून्य करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या वसूली मोहिमेला महावितरणने अधिक गती दिली असून, प्रतिसाद न देणाऱ्या तब्बल २७ हजार थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांनी तात्काळ थकबाकीसह चालू बिल भरून सहकार्य करावे, अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळता येणार नाही, असे आवाहन मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी केले आहे.

अमरावती परिमंडळात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर लघुदाब वर्गवारीतील एकूण ३ लाख १७ हजार ९२१ ग्राहकांकडे तब्बल ७१४ कोटी ५ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील १ लाख ५२ हजार ११५ ग्राहकांकडे २६६ कोटी ७९ लाख, तर यवतमाळ जिल्ह्यातील १ लाख ६५ हजार ८०६ ग्राहकांकडे ४४७ कोटी २६ लाख रुपये थकीत आहेत.

महावितरणच्या (Mahavitaran Action) अस्तित्वासाठी वीजबिल वसुली अत्यावश्यक असल्याने जानेवारीपासून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मुख्य अभियंता अशोक साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, उपविभागीय व शाखा अभियंते तसेच तांत्रिक कर्मचारी प्रत्यक्ष ग्राहकांशी संपर्क साधून वसूलीसाठी प्रयत्न करत आहेत.

३५ कोटींच्या थकबाकीसाठी २६,९९१ वीज जोडण्या खंडित:
महावितरणच्या धडक (Mahavitaran Action) कारवाईत ३४ कोटी ४९ लाख रुपयांच्या थकबाकीसाठी २६ हजार ९९१ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील १० हजार ३५० ग्राहकांकडे ११ कोटी ७१ लाख, तर यवतमाळ जिल्ह्यातील १६ हजार ६४१ ग्राहकांकडे २३ कोटी ७८ लाख रुपये थकीत आहेत.

सामूहिक कारवाईला वेग:
आर्थिक वर्ष संपण्यास अवघे काही दिवस उरले असल्याने प्रतिसाद न देणाऱ्या भागात सामूहिक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आवश्यकतेनुसार पोलिसांची मदतही घेतली जाणार आहे. कारवाईदरम्यान थकबाकीदारांचे मीटर काढण्यात येत असून, मीटर काढल्यानंतर अनधिकृत वीज वापर आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

सुट्टीच्या दिवशीही वसूली मोहिम आणि बिल भरणा केंद्र सुरू:
ग्राहकांच्या सोयीसाठी सुट्टीच्या दिवशीही वसूली मोहीम सुरू ठेवण्यात आली आहे. तसेच महावितरणची बिल भरणा केंद्रे आणि ऑनलाईन भरणा सुविधा उपलब्ध ठेवण्यात आली आहे. महावितरणने सर्व ग्राहकांना आवाहन केले आहे की, थकबाकी व चालू वीजबिले तात्काळ भरून संभाव्य गैरसोय टाळावी.