Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

महावीर जयंती

हिंगोलीत महावीर जयंती उत्साहात साजरी, आ. संतोष बांगर यांचा संदेश

Mahavir Jayanti: हिंगोलीत महावीर जयंती उत्साहात साजरी. आमदार संतोष बांगर यांनी 'जीओ और जीने दो' चा संदेश देत अहिंसा व सत्याचा मार्ग अंगीकारण्याची आवश्यकता उल्लेखली.


हिंगोलीत महावीर जयंती उत्साहात साजरी आ संतोष बांगर यांचा संदेश

आमदार संतोष बांगर यांचा “जीओ और जीने दो”चा संदेश

हिंगोली (Mahavir Jayanti) : भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक (महावीर जयंती) निमित्त आज हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून जैन बांधवांनी हा सण मोठ्या भक्तीभावात साजरा केला. यानिमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.

​भव्य मिरवणूक आणि मार्ग

हिंगोली शहरातील पोस्ट ऑफिस रोड वरील श्वेतांबरी जैन मंदिर येथून सकल श्वेतांबरी जैन समाजाच्या वतीने (Mahavir Jayanti) महावीर जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक शहरातील मुख्य मार्गावरून म्हणजे: मोंढा परिसर, जवाहर रोड, गांधी चौक ​या मार्गावरून मार्गस्थ होत असताना जैन बांधवांनी भगवान महावीरांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून टाकला होता. मान्यवरांची उपस्थिती, ​या उत्साहात लोकप्रतिनिधींनी देखील सहभाग नोंदवून जैन समाजाला शुभेच्छा दिल्या. मिरवणुकीमध्ये प्रामुख्याने  मान्यवर सहभागी झाले होते. ज्यामध्ये संतोष बांगर (आमदार, कळमनुरी), गजानन घुगे (माजी आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष), ओम हेडा, सुभाष तापडिया यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव आणि नागरिक उपस्थित होते.



आमदार संतोष बांगर यांचे मार्गदर्शन
​याप्रसंगी आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी नागरिकांशी संवाद साधताना भगवान महावीरांच्या (Mahavir Jayanti) विचारांची आजच्या काळात असलेली गरज अधोरेखित केली. त्यांनी आपल्या भाषणात ​"जीओ और जीने दो" चा विसर नको यावर मनोगत व्यक्त केले. भगवान महावीरांनी दिलेला 'जीओ और जीने दो' हा संदेश आजच्या धावपळीच्या जीवनात आपण कुठेतरी विसरत चाललो आहोत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

​अहिंसा आणि सत्याचा मार्ग: प्रत्येकाने आपल्या जीवनात अहिंसा, संयम आणि सत्याचा मार्ग अंगीकारण्याची गरज आहे. "चांगलं खा, चांगलं वागा आणि चांगलं रहा" या त्रिसूत्रीतून समाजात शांतता आणि सौहार्द निर्माण होऊ शकते. शेवटी, सर्व धर्मीयांनी भगवान महावीरांच्या उदात्त गुणांचा स्वीकार करून जनतेच्या हितासाठी कार्य करावे, असे आवाहन करत आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी सर्वांना महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Related to this topic: