Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

चिखली नामकरण रेणुका नगर

चिखली शहराचे नामकरण रेणुका नगर करावे: शिवसेना

Naming Renuka Nagar: रेणुकामाता हिंदीहृदयसम्राट ठाकरेंच्या जन्मशताब्दी वेळी चिखलीतील शिवसैनिकांनी शहराचे नाव रेणुका नगर करण्याचे मागणी दाखल केले. या संदर्भात शासनास युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे


चिखली शहराचे नामकरण रेणुका नगर करावे शिवसेना

Naming Renuka Nagar |

चिखली (Naming Renuka Nagar) : रेणुका मातेच्या नगरीमध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाप्रसंगी  चिखलीतील शिवसैनिकांनी चिखली शहराचे नाव रेणुका नगर करण्याची मागणी यावेळी केली. तसेच युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली शहराचे ग्रामदैवत असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रेणुका मातेला बुलढाणा जिल्हा युवासेना तसेच चिखली शिवसेनेच्या वतीने युवा सेना जिल्हाप्रमुख नंदूभाऊ कऱ्हाडे यांचे नेतृत्वात पातळ अर्पण करण्यात आले. शहरातून वाजत गाजत मिरवणूक नेत मातेच्या चरणी पातळ अर्पण करण्यात आले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख श्रीरामभाऊ झोरे उपजिल्हाप्रमुख विलास सुरडकर तालुकाप्रमुख किसनराव धोंडगे युवा सेना शहरप्रमुख आनंद गैची यांची प्रमुख उपस्थिती होती.

रेणुका मातेच्या चरणी पातळ अर्पण केल्यानंतर ही मिरवणूक (Naming Renuka Nagar) चिखली नगरपालिकेकडे प्रस्थान करती झाली. यावेळी चिखली नगर परिषदेमध्ये उपस्थित असलेल्या उपाध्यक्ष वैशालीताई कपिल खेडेकर यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संपूर्ण  महाराष्ट्रात चिखली शहराची ओळख ही रेणुका नगर म्हणून असून चिखलीचे ग्रामदैवत असलेली रेणुकामाता ही लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे अनेक भाविक चैत्र पौर्णिमेला वहन मिरवणुकीत सहभागी होऊन आपले नवस पूर्ण करत असतात अशी नवसाला पावणारी ही रेणुका माता म्हणून जिल्ह्यातील एक श्रद्धेचे स्थान बनले आहे. विशेष म्हणजे सर्व धर्मीय नागरिकांचा या वहन मिरवणुकीमध्ये समावेश असतो त्यामुळे चिखली शहराचे नाव हे रेणुकानगर करण्यात यावे, अशी आग्रही मागणी निवेदनाच्या द्वारा करण्यात आली आहे. यावेळी निवेदन स्वीकारताना नप उपाध्यक्ष वैशालीताई कपिल खेडेकर यांनी या संदर्भात तात्काळ ठराव घेऊन शासनाकडे मागणी करू व या मागणीचा पाठपुरावा देखील करण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले. तसेच चिखली शहराचे (Naming Renuka Nagar) नामकरण रेणुका नगर झाल्यानंतर युवासेना प्रमुख माननीय आदित्य ठाकरे साहेब हे शहराला भेट देऊन माते चरणी पातळ अर्पण करणार असल्याचे देखील युवा सेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे यांनी सांगितले.

यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख नंदूभाऊ कऱ्हाडे, श्रीरामभाऊ झोरे विलासराव सुरडकर, किसनराव धोंडगे, शिवाजीराव पवार लालसिंग मोरे नारायण वाणी, अशोक राजपूत आनंद गैची,अण्णा देवकर बंडू सरसे, किशोर डहाळे, वसंता अंभोरे, अशोकराव मोहिते, समाधान जाधव, संतोष देशमुख, छगनराव वानखेडे, शुभम वानखेडे, बंडू गार्डे, निवृत्ती घुबे, गजानन साखरे, गणेश कुडके, साजितभाई अरुण अंबासकर, रामराव अंभोरे, गजानन कुटे, अंकुश डहाके, भास्कर शेजोळ, विठ्ठल घुबे, लक्ष्मण इंगळे, कैलास इंगळे, दीपक जाधव, राजेश लोखंडे, संतोष देशमुख, सचिन जोशी, दीपक सोलाट, शेख सोहेल, राहुल वरवंदे, प्रदीप गरुड रामराव अंभोरे, वसंतराव चवरे, मंगेश मोळवंडे, ऋषी शेळके, सलमान शहा, गजानन फोलाने, प्रकाश शेळके, प्रल्हाद कऱ्हाडे, सुपूडाजी कोऱ्हाळे, राजू झोरे बंटी कपूर, ज्ञानेश्वर गायकवाड, विनायक जाधव, देविदास लोखंडे, राजू कारले, पवन काळे, विशाल वानखेडे, विजय जाधव, प्रकाश काळे, विशाल ठेंग, आकाश नेवरे, कैलास गायकवाड, उमेश झोरे, समाधान गायकवाड, आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Related to this topic: