Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

महाराष्ट्र जलसंधारण अभियान

सुधाकररावजी नाईक जलसंधारण अभियानद्वारे विविध कार्यक्रम व उपक्रम राज्यभरात राबवावे!

Water Conservation Campaign: महाराष्ट्र शासनाने नुकताच माजी मुख्यमंत्री तथा 'जलसंधारणाचे प्रणेते' सुधाकररावजी नाईक साहेब यांचा २१ ऑगस्ट हा जयंतीदिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय


सुधाकररावजी नाईक जलसंधारण अभियानद्वारे विविध कार्यक्रम व उपक्रम राज्यभरात राबवावे 

Water Conservation Campaign |

 

वसंत-विचारधारा मंचने केली मागणी; जलसंधारण मंत्री संजय राठोड यांना निवेदन 

मानोरा (Water Conservation Campaign) : महाराष्ट्र शासनाने नुकताच माजी मुख्यमंत्री तथा 'जलसंधारणाचे प्रणेते' सुधाकररावजी नाईक साहेब यांचा २१ ऑगस्ट हा जयंतीदिवस "जलसंधारण दिन" म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे, सुधाकररावजी नाईक साहेबांना 'जलक्रांतीचे शिल्पकार', 'जलसंधारणाचे प्रणेते' म्हणून ओळखले जाते कारण त्यांनी जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता त्यामुळे '२१ ऑगस्ट जलसंधारण दिन' हा दिवस केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता "जलआंदोलन", "जलचळवळ" म्हणून साजरा करणे अधिक परिणामकारक ठरेल अशी सुधाकरराव नाईक साहेबांच्या अनुयायींची जनभावना आहे.

या "जलसंधारण दिन" चे (Water Conservation Campaign) स्वरूप "वनमहोत्सव", "स्वच्छता अभियान" किंवा "मतदार जनजागृती अभियान" यांसारखे लोक सहभागावर आधारित राज्यव्यापी अभियान बनवता येऊ शकते. ज्याव्दारे "सुधाकररावजी नाईक जलसंधारण दिन" हा महाराष्ट्राच्या जलसुरक्षेसाठी दीर्घकालीन लोकचळवळीचा पाया ठरू शकतो. २१ ऑगस्ट हा दिवस 'महाराष्ट्राची जलचळवळ' बनण्यासाठी विविध स्तरांवर कार्यक्रम आणि उपक्रम राबवले जावेत अशा मागणीचे 'वसंत विचारधारा मंच, महाराष्ट्र' ने बनवलेला १३ पानी मसुदा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड आणि राज्यमंत्री  इंद्रनिल नाईक यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष  तथा महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या हस्ते व  आ. राजेश राठोड (मा. प्रत्तोद, विधान परिषद), सुरेश पवार जालना जिल्हा काँग्रेस कमिटी सचिव, निलेश राठोड ओएसडी मुंबई यांच्या उपस्थितीत निवेदनाद्वारे दिले. 'सुधाकररावजी नाईक जलसंधारण अभियान' च्या मसुद्याच्या अनुषंगाने पुढील आठवड्यात जलसंधारण विभागाचे प्रधानसचिव व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक लावणार असल्याचे मंत्र्यांनी आश्वासन दिले आहे.