Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद

आज महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक

Maharashtra Medical Council: हिंगोलीतील परिचारीका महाविद्यालयात महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक २६ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे. जिल्हा प्रशासनाने सर्व डॉक्टरांना मतदानासाठी आव्हान दिले आहे.


आज महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक

Maharashtra Medical Council |

डॉक्टरांनी मतदानाचा हक्क बजवावा

हिंगोली (Maharashtra Medical Council) : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची (MMC) ची निवडणूक रविवार दि. २६ एप्रिल  २०२६ रोजी,  पहिला मजला, परिचारीका महाविद्यालय ईमारत, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, हिंगोली या मतदान केंद्रावर पार पडणार आहे. सर्व नोंदणीकृत डॉक्टर मतदारांनी या लोकशाही प्रक्रियेत सहभागी  होऊन आपला मतदानाचा हक्क जबाबादारीने पार पाडावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
    
ही (Maharashtra Medical Council) निवडणूक दि.२६ एप्रिल २०२६ रोजी पहिला मजला, परिचारीका महाविद्यालय ईमारत, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, हिंगोली येथे होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.  मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविण्यासाठी खालीलपैकी कोणतेही एक मूळ दस्तऐवज सोबत ठेवणे अनिवार्य आहे.

१) महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने दिलेली नोंदणी प्रमाणपत्र (Registration Certificate) जर यावर छायाचित्र नसेल तर त्यासोबत अन्य फोटो आयडी पुरवा जोडणे आवश्यक आहे. 
२) महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने दिलेले ओळखपत्र (Identity Card). 
३) भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीसाठी मान्यता दिलेले छायाचित्रासंहित ओळखपत्र.
४) विवाहित महिला मतदारांसाठी जर नाव बदलेले असेल तर नाव बदलल्याबाबतचा अधिकृत पुरावा (शासन अधिसूचना/ गॅझेट) सादर करणे आवश्यक आहे.

मोबाईल आणि कॅमेरा, मतदान केंद्राच्या आत  नेण्यास सक्त मनाई आहे. तसेच, कोणत्याही व्यक्तीस व्हिडिओ कॅमेरा वापरण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही. मतदान पध्दत: मतदान गुप्त व पारंपारिक पध्दतीने मतपत्रिकेव्दारे घेण्यात येईल.

मतदान प्रक्रिया : प्रत्येक मतदारास नऊ (९) मते देता येतील. मतदारास ज्या उमेदवारास मत द्यायचे आहे, त्यांच्या नावासमोर (X) अशी खूण त्यांना पुरविण्यात आलेल्या काळ्या बॉल पेनाने करावी अशा महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.
सर्व डॉक्टर मतदारांनी या लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क जबाबदारीने पार पडावा असे आव्हान जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे.

Related to this topic: