Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

प्राचार्य डॉ. किरण खंडारे

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने प्राचार्य डॉ. किरण खंडारे यांचा सन्मान

Principal Dr. Kiran Khandare:शिरडीमध्ये आयोजित राज्यस्तरीय 'आदर्श शिक्षक पुरस्कार' सोहळ्यात, पातूर येथील प्राचार्य डॉ. Kiran S. Khandarे यांना शिक्षण क्षेत्रातील नाटकीय योगदानासाठी गौरवित करण्यात आले.


राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने प्राचार्य डॉ किरण खंडारे यांचा सन्मान

Principal Dr. Kiran Khandare |

पातूर (Principal Dr. Kiran Khandare) : शिर्डी येथे बी दि चेंज फाउंडेशनतर्फे आयोजित राज्यस्तरीय 'आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६' वितरण सोहळ्यात पातूर येथील प्राचार्य डॉ. किरण एस. खंडारे यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल 'आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६' प्रदान करून गौरविण्यात आले. साय पालखी निवारा, शिर्डी येथे रविवारी पार पडलेल्या या राज्यस्तरीय सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील गुणवंत, कर्तव्यनिष्ठ आणि समाजाभिमुख शिक्षकांचा त्यांच्या शैक्षणिक तसेच सामाजिक योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला. यावेळी पातूर येथील प्राचार्य डॉ. किरण एस. खंडारे (Principal Dr. Kiran Khandare) यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक अधिकारी सुभेदार मेजर दिनकर पवार, अरुण भंडारे, अभिनेत्री निवेदिता पगार, बाबासाहेब कापे, प्रकाश कोळपे तसेच अमृत रोहेम यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच संस्थेचे अध्यक्ष मयूर होकेचोळे, सचिव रचना होकेचोळे आणि विश्वस्त अभिषेक तुपे यांनीही कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. प्राचार्य डॉ. किरण एस. खंडारे  (Principal Dr. Kiran Khandare) यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शिक्षण क्षेत्रासह सामाजिक, राजकीय आणि विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.