Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

वाशिम जिल्हा भाजप

वाशिम जिल्ह्यात शिवसेना उबाठाला मोठे खिंडार; सुरेश मापारींचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश!

Washim District BJP: वाशिम जिल्ह्यात शिवसेना उबाठलेल्या जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.


वाशिम जिल्ह्यात शिवसेना उबाठाला मोठे खिंडार सुरेश मापारींचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

Washim District BJP |

वाशिम (Washim District BJP) : वाशिम जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी घडामोड समोर आली आहे. ग्रामीण भागातील राजकारणावर दीर्घकाळ मजबूत पकड असणारे शिवसेने उबाठाचे ज्येष्ठ नेते तथा मावळते जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी अखेर आपल्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. मुंबई येथे आयोजित एका विशेष सोहळ्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जाहीर पक्षप्रवेश पार पडला. या मोठ्या घडामोडीमुळे वाशिम जिल्ह्यातील आगामी निवडणुकांचे संपूर्ण राजकीय समीकरण आता बदलणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सुरेश मापारी यांच्या नेतृत्वात २३ मे रोजी ३० ते ३२ वाहनांचा मोठा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाला होता. या (Washim District BJP) ताफ्यात जिल्ह्यातील विविध गावांचे सरपंच, आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, बाजार समितीचे माजी सदस्य यांच्यासह ग्रामीण भागातील २०० हून अधिक प्रमुख आणि क्रियाशील पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. मापारी यांच्या या निर्णयाला पाठिंबा देत वाशिममधील शिवसेनेचे काही शहर प्रमुख, तालुका प्रमुख, युवा सेना पदाधिकारी आणि इतर अनेक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे देऊन भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.

आपल्या आक्रमक आणि डावपेचात्मक कार्यपद्धतीसाठी ओळखले जाणारे सुरेश मापारी यांचा ग्रामीण भागात तळागाळापर्यंत दांडगा जनसंपर्क आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि जिल्हा मध्यवर्ती बँक अशा सर्वच स्तरांवरील निवडणुकांमध्ये त्यांनी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र, गेल्या काही काळापासून पक्षीय पातळीवरील वाढती अस्वस्थता आणि कार्यकर्त्यांकडून भाजपमध्ये जाण्यासाठी होत असलेला सातत्यपूर्ण आग्रह, यांमुळेच त्यांनी हा मोठा राजकीय निर्णय घेतला आहे.

या (Washim District BJP) भव्य पक्षप्रवेशामुळे वाशिम जिल्ह्यात भाजपची संघटनशक्ती कमालीची वाढली असून पक्षाला मोठे बळ मिळाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये थेट प्रभाव असणाऱ्या खमक्या कार्यकर्त्यांची मोठी फळीच मापारी यांच्यासोबत भाजपमध्ये आल्याने विरोधकांना मोठा धक्का बसला आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या या पक्षांतरामुळे भाजपची स्थिती अत्यंत भक्कम झाली असून, ही घडामोड जिल्ह्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरेल. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मापारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून जिल्ह्यात भाजपचा विजयरथ अधिक वेगाने पुढे नेण्याचा विश्वास व्यक्त केला.

Related to this topic: