Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी पीक विमा

परभणीत १७ महसूल मंडळांवरील विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले..

Parbhani Pik Vima: पीक विमा कंपनीने १७ महसूल मंडळांबाबत दाखल केलेले आक्षेप विभागीय आयुक्तांनी फेटाळून लावत जिल्हाधिकारी परभणी यांनी सादर केलेला अहवाल मान्य केला आहे.


परभणीत १७ महसूल मंडळांवरील विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले

Parbhani Pik Vima |

 

पीक विम्याचा मार्ग मोकळा; आ. राजेश विटेकर यांच्या पाठपुराव्याला यश

पाथरी (Parbhani Pik Vima): पीक विमा कंपनीने १७ महसूल मंडळांबाबत दाखल केलेले आक्षेप विभागीय आयुक्तांनी फेटाळून लावत जिल्हाधिकारी परभणी यांनी सादर केलेला अहवाल मान्य केला आहे. त्यामुळे या महसूल मंडळांतील हजारो शेतकर्‍यांना प्रलंबित पीक विमा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या प्रकरणात आ.राजेश विटेकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीनुसार १३ मे रोजी राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणे यांच्या दालनात बैठक झाली होती. त्यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी शेतकर्‍यांकडून प्राप्त तक्रारींची फेरतपासणी करून नव्याने अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी अहवाल पाठविल्यानंतर (Parbhani Pik Vima) पीक विमा कंपनीने १७ महसूल मंडळांबाबत विभागीय आयुक्तांकडे आक्षेप दाखल केले होते. मात्र सुनावणी दरम्यान जिल्हाधिकार्‍यांचा अहवाल ग्राह्य धरत विभागीय आयुक्तांनी कंपनीचे सर्व आक्षेप फेटाळले. या निर्णयाची माहिती विभागीय आयुक्तांनी आ.राजेश विटेकर व त्यांच्या शिष्टमंडळाला दिली. तसेच हा अहवाल कृषिमंत्री, कृषी आयुक्त आणि प्रधान सचिव (कृषी) यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. पीक विमा प्रकरणातील सुनावणी नंतर विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांची आमदार राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेतली. यामध्ये एकनाथराव साळवे, विलासराव बाबर आणि रामभाऊ आरगडे यांचा समावेश होता. या वेळी विभागीय आयुक्तांनी कंपनीचे आक्षेप फेटाळून जिल्हाधिकार्‍यांचा अहवाल मान्य केल्याची माहिती शिष्टमंडळाला दिली.

सन २०२४ मधील प्रलंबित प्रकरणांपैकी पाच महसूल मंडळांना यापूर्वी ३७ कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे. मात्र दैठणा, टाकळी कुंभकर्ण आणि रावराजूर या महसूल मंडळांतील शेतकरी अद्याप मदतीपासून वंचित आहेत. या महसूल मंडळांचाही प्रश्न निकाली काढण्यासाठी लवकरच प्रधान सचिव (कृषी) यांची भेट घेऊन पुढील पाठपुरावा केला जाणार आहे.
-आ. राजेश विटेकर

या १७ महसूल मंडळांना मिळणार दिलासा

विभागीय आयुक्तांनी ज्या महसूल मंडळांवरील विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले, त्या मंडळांमध्ये जांब, परभणी ग्रामीण, परभणी शहर, पेडगाव, पिंगळी, सिंगणापूर, टाकळी कुंभकर्ण, झरी, पिंपळदरी, राणीसावरगाव, पेठशिवणी, चुडावा, कावलगाव , लिमला , आवलगाव ,  सोनपेठ आणि वडगाव यांचा समावेश आहे. या महसूल मंडळांतील शेतकर्‍यांना आता प्रलंबित पीक विमा मंजूर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related to this topic: