Parbhani Mundan Protest: जीएसटी अनुदान फरकाची रक्कम आणि थकीत वेतनासाठी महापालिका कर्मचार्यांनी आंदोलनात शुक्रवार १४ ऑगस्ट रोजी कर्मचार्यांनी मुंडण, पिंडदान आंदोलन
जीएसटी फरकाचे अनुदान देण्याची मागणी; सोमवार पासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा...!
परभणी (Parbhani Mundan Protest) : जीएसटी अनुदान फरकाची रक्कम आणि थकीत वेतनासाठी महापालिका कर्मचार्यांनी सोमवार १० ऑगस्ट पासून आंदोलन सुरू केले आहे. याच आंदोलनात शुक्रवार १४ ऑगस्ट रोजी कर्मचार्यांनी मुंडण, पिंडदान आंदोलन केले. पुढील दोन दिवस आंदोलनाला स्थगिती देण्यात आली असून सोमवार पासून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. जीएसटी फरकाच्या अनुदानाची रक्कम न आल्याने कर्मचार्यांचे वेतन, सेवानिवृत्ती उपदान व इतर आर्थिक बाबींची अडचण झाली आहे.
सदर ७२ कोटीचा निधी मिळाल्यास महापालिकेतील आर्थिक समस्या बहुतांशी मार्गी लागण्यास मदत होईल. जीएसटी अनुदान व वेतनाकडे लक्ष वेधण्यासाठी महापालिका कर्मचार्यांनी १० ऑगस्ट पासून आंदोलन सुरू केले आहे. विविध पध्दतीने आंदोलन (Parbhani Mundan Protest) करत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येत आहे. शुक्रवार १४ ऑगस्टला कर्मचार्यांनी मुंडण, पिंडदान आंदोलन केले. यावेळी मोठ्या संख्येने मनपा कर्मचार्यांची उपस्थिती होती.