Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग

सेंट इग्निशियन सोसायटीचा अल्पसंख्याक दर्जा रद्द करण्याची शिफारस; आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Minorities Commission: सेंट इग्निशियन एज्युकेशन सोसायटी, नागपूर या संस्थेच्या अल्पसंख्याक दर्जाबाबत मोठी घडामोड समोर, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाने संस्थेचा अल्पसंख्याक दर्जा रद्द


सेंट इग्निशियन सोसायटीचा अल्पसंख्याक दर्जा रद्द करण्याची शिफारस आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Minorities Commission |

नागपूर (Maharashtra Minorities Commission) : सेंट इग्निशियन एज्युकेशन सोसायटी, नागपूर या संस्थेच्या अल्पसंख्याक दर्जाबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाने संस्थेचा अल्पसंख्याक दर्जा रद्द करण्याची शिफारस केली असून, संबंधित शाळा प्रशासनाविरोधात नियमानुसार कारवाईचे निर्देश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संस्थेचे माजी कार्यकारी अध्यक्ष इग्नेशियन अँटोनी बॅस्टीयन यांनी सेंट इग्निशियन एज्युकेशन सोसायटी अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या सेंट विसेंट अप्पर प्राथमिक शाळा आणि अमित विद्या मंदिर, मानेवाडा रोड, उदयनगर या शाळांनी अल्पसंख्याक दर्जाचा लाभ घेत शासनाची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाकडे केली होती.

अल्पसंख्याक दर्जाच्या गैरवापराचा आरोप

तक्रारीनंतर शिक्षण विभागाच्या माध्यमातून चौकशी समिती गठित करण्यात आली. (Maharashtra Minorities Commission) समितीने सादर केलेल्या अहवालात संस्थेकडे धार्मिक अल्पसंख्याक समुदायाचे सदस्य असल्याचे आवश्यक अभिलेख उपलब्ध नसल्याचे नमूद करण्यात आले. तसेच सेंट इग्निशियन सोसायटी अंतर्गत चालणारी सेंट विसेंट स्कूल, तपस्या नगर स्क्वेअर, मानेवाडा रिंग रोड, नागपूर ही शाळा प्रशासनिक पातळीवर दोषी असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले.

यानंतर हा अहवाल महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाकडे (Maharashtra Minorities Commission) पाठविण्यात आला. आयोगाने 22 एप्रिल 2026 रोजी सुनावणी घेतली. सुनावणीदरम्यान संस्थेची कार्यकारिणी अल्पसंख्याक समुदायाची नसल्याचे आणि अल्पसंख्याक दर्जासाठी आवश्यक पुरावे उपलब्ध नसल्याचे आढळून आल्याने संस्थेचा अल्पसंख्याक दर्जा तात्काळ रद्द करण्याची शिफारस करण्यात आली.

नागपूरातील शैक्षणिक संस्थेवर कारवाईचे निर्देश

तसेच चौकशी अहवालातील निष्कर्षांच्या आधारे संबंधित शाळा प्रशासनाविरोधात नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देशही आयोगाने दिले आहेत. याबाबतचा सुनावणी अहवाल आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद नागपूर यांचे पत्र संबंधित विभागांना पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले आहे. या प्रकरणामुळे नागपूरातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून, शासनाकडून पुढे कोणती कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.