Mass wedding ceremony: लातूरमध्ये व्ही. एस. पँथर्सच्या उपक्रमाने आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात 36 जोडपे विवाहबद्ध झाली, समारोहात मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती.
व्ही. एस. पँथर्सच्या उपक्रमाचे सातवे वर्ष : वऱ्हाडींसह मान्यवरांची उपस्थिती
लातूर (Mass wedding ceremony) : येथील व्ही. एस. पँथर्स युवा संघटनेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त सातवा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर रविवारी (दि.10) सायंकाळी थाटामाटात पार पडला. व्ही. एस. पँथर्सच्या उपक्रमाचे सलग सातवे वर्ष असून या विवाह सोहळ्यास वऱ्हाडींसह राज्याचे मंत्री आमदार आणि मान्यवरांची उपस्थिती होती.
या (Mass wedding ceremony) विवाह सोहळ्याला राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, औसा विधानसभेचे लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार, माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक इंजि. अनिल कुमार गायकवाड, माजी खासदार सुनील गायकवाड, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, सेवाकुंडचे अध्यक्ष अश्वजीत गायकवाड, महापौर जयश्री सोनकांबळे, एडवोकेट बळवंत जाधव एडवोकेट बी. एल. शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, शहर पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे, युवा उद्योजक विनोद मुळे, डॉ. सिद्धार्थ सूर्यवंशी , पुणे मनपाचे माजी नगरसेवक प्रशांत म्हस्के, आनंद आलकुंटे, पुणे येथील उद्योजक रामभाऊ जगदाळे, आंबेडकरी चळवळीतील नेते नितीन शेलार, उरळी कांचन येथील सामाजिक कार्यकर्ते शक्ती भाऊ बडेकर, श्रीनिवास वाघ, गुलजीतसिंग जुंनी, डॉ. सचिन जाधव, डॉ. नितीन लहाने, पत्रकार अशोक देडे, अशोक हनवते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी संघटनेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून समारोह सुरुवात करण्यात आली. यानंतर संघटनेच्या वतीने विवाह सोहळ्यास उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या सर्वधर्मीय (Mass wedding ceremony) सामूहिक विवाह सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी संस्थापक अध्यक्ष विनोद भाऊ खटके आणि प्रदेशाध्यक्ष तथा माजी नगरसेवक सचिन भाऊ मस्के यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा अध्यक्ष निलेश कांबळे संपर्कप्रमुख आनंद जाधव, जिल्हाध्यक्ष शरद किनीकर, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष किरण पायाळ, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष स्वप्निल कांबळे, ऑटो युनियन जिल्हाध्यक्ष देवा गायकवाड, विद्यार्थी आघाडी मराठवाडा अध्यक्ष प्रीतम दंडे, शहराध्यक्ष जिल्हा कार्याध्यक्ष अकबर शेख, असद भाई शेख, कामगार आघाडी शहराध्यक्ष गौस शेख, कामगार आघाडी जिल्हा संघटक गोविंद कांबळे, कामगार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष हुसेन मादळे, ग्रुप जिल्हाध्यक्ष अजय सूर्यवंशी, वाहतूक आघाडी शहराध्यक्ष शाहरुख मणियार, विलास कसबे, मनोज गायकवाड, ऍड. रमक जोगदंड, अजय सूर्यवंशी, सुजीत कांबळे, आबासाहेब गायकवाड, अतुल होळकर, नितीन सोनवणे, साईनाथ कांबळे, सुरज सूर्यवंशी, सुबोध कांबळे महादेव कांबळे अविष्कार कांबळे, औसा तालुकाध्यक्ष सुनील सातपुते, महेश कांबळे, निलंगा तालुकाध्यक्ष धनराज सुरवसे, धम्मा वाघचौरे, सिद्धार्थ वाघचौरे, युनूस शेख, करण कांबळे, चाकूर तालुका अध्यक्ष अजय वाघमारे, अहमदपूर तालुका अध्यक्ष आदित्य गुळवे, रोहन कांबळे, सिद्धार्थ किणीकर , संतोष कांबळे, संजीव सुरवसे भूषण आचार्य, नारायण चव्हाण आदींसह जिल्हाभरातील पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. या विवाह सोहळ्याचे प्रास्ताविक संघटनेचे मार्गदर्शक संतोष मांदळे यांनी केले तर सूत्रसंचलन सुशील सूर्यवंशी यांनी केले आणि आभार रवि कुरील यांनी मानले.
15000 वऱ्हाडीची उपस्थिती आणि भोजन व्यवस्था!
या (Mass wedding ceremony) विवाह सोहळ्यात नवदांपत्यांना बूट चप्पल, मणी मंगळसूत्र, जोडवे, विवाहाचे ड्रेस, गादी पलंग, संसार उपयोगी साहित्य देण्यात आले. या विवाह सोहळ्यामध्ये दोन मुस्लिम जोडपे, 13 हिंदू जोडपे आणि 21 बौद्ध जोडपे विवाहबद्ध झाले. या विवाह सोहळ्याला आदरणीय भन्ते डॉ. उपगुप्त थेरो, भन्तेजी महाविरोथेरो, बौद्धाचार्य केशव कांबळे, काजी आणि पुरोहित यांनी विवाहाचा विधी संपन्न केला. या विवाह सोहळ्याला जवळपास 15000 वऱ्हाडी मंडळी उपस्थित होते. यांच्या सगळ्यांच्या भोजनाची व्यवस्था संघटनेच्या वतीने चोख करण्यात आली होती.
खटके यांनी केले सहकाऱ्यांचे अभिनंदन!
यावेळी बोलताना विनोद खटके यांनी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले विवाह सोहळ्यासाठी गठीत केलेल्या समित्यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पडल्याबद्दल सर्व समिती प्रमुखांचे अभिनंदन केले. हा विवाह सोहळा यशस्वी करण्यामध्ये माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
सामूहिक विवाह सोहळा समाज उपयोगी: सहकार मंत्री
यावेळी बोलताना अभिमन्यू पवार यांनी या विवाह सोहळ्याच्या आयोजनाबद्दल संघटनेचे कौतुक केले. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी हा विवाह सोहळा समाज उपयोगी असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी बोलताना संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले की, विनोद भाऊ खटके आणि त्यांचे सहकारी समाजाचे ऋण फेडण्यासाठी नेहमीच कार्यरत असतात. सामाजिक राजकीय प्रश्नावर आवाज उठवतात. व्ही. एस. पॅंथरचे काम हे इतरांनी आदर्श घ्यावा, असे आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी 75 फुटी पुतळा उभारण्यात येत आहे. त्यामध्ये कोणीही राजकारण आणू नये, असे प्रतिपादन केले.