Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

मराठा सेवा संघ

मराठा सेवा संघाच्या चिखली तालुकाध्यक्षपदी सेवानिवृत्त प्राचार्य नंदकिशोर गायकवाड यांची निवड

Maratha Seva Sangh: मराठा सेवा संघाच्या चिखली तालुक्यातील बैठकीत सेवानिवृत्त प्राचार्य नंदकिशोर गायकवाड यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. नावीन्य कार्यकारिणी


मराठा सेवा संघाच्या चिखली तालुकाध्यक्षपदी सेवानिवृत्त प्राचार्य नंदकिशोर गायकवाड यांची निवड 

Maratha Seva Sangh |

चिखली (Maratha Seva Sangh) : शासकीय विश्रामगृह, चिखली येथे मराठा सेवा संघाची बैठक जिल्हाध्यक्ष तथा सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता रविकांतजी काळवाघे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत चिखली तालुका मराठा सेवा संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. तसेच सेवानिवृत्त प्राचार्य नंदकिशोर शेषराव गायकवाड यांची मराठा सेवा संघाच्या चिखली तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

नवीन कार्यकारिणीतील ईतर पदाधिकारी पुढील प्रमाणे आहेत : सुरेश शिवसिंग इंगळे (कार्याध्यक्ष), अर्जुनराव तुकाराम इंगळे (उपाध्यक्ष), बाळासाहेब रावसाहेब ठाकरे (उपाध्यक्ष), शेख चाँद शेख गुलाब (सचिव), अरुण दगडूजी गरुड (सहसचिव), मोहन पंजाबराव ठोसरे (सहसचिव), जीवन सूर्यभान शेटे (कोषाध्यक्ष), दशरथ रामचंद्र सावळे (प्रसिद्धी प्रमुख) आणि अॅड. सलीम शेख (विधी सल्लागार).

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष रविकांतजी काळवाघे यांनी सांगितले की,नूतन तालुकाध्यक्ष नंदकिशोर गायकवाड यांना मराठा सेवा संघाच्या विचारांचा वारसा त्यांचे वडील स्वर्गीय शेषरावजी गायकवाड (सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी, बुलढाणा) यांच्याकडून लाभला आहे.त्यामुळे गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली चिखली तालुक्यात मराठा सेवा संघाच्या विचारांना व कार्याला निश्चितच नवी उभारी मिळेल आणि ही चळवळ अधिक जोमाने पुढे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी रविकांतजी काळवाघे तसेच सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी समाधान खेडेकर यांनी मराठा सेवा संघाचे विचार समाजातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे,असे आवाहन केले.

नूतन तालुकाध्यक्ष नंदकिशोर गायकवाड यांनी संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने मराठा सेवा संघाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याची ग्वाही दिली. तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी गायकवाड यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.तसेच रविकांतजी काळवाघे यांनी गायकवाड यांचा सत्कार करून त्यांना प्रसिद्ध साहित्यिक आ. ह. साळुंखे यांनी लिहिलेले “शंभर कोटी मेंदू, दोनशे कोटी हात” हे पुस्तक भेट दिले.

या (Maratha Seva Sangh) बैठकीस सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी समाधान खेडेकर, प्राचार्य सुनील देशमुख, राजू काकडे (जिल्हा कार्यकारिणी सदस्य), प्रा. डी. आर. सावळे तसेच सौरभ शेख यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.