Breaking News
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
  • मुक्ताईनगरात दोन गुटखा तस्कर जेरबंद, वाहन जप्त
  • नाशिकला पुढील 3 दिवसाचा पावसाचा यलो अलर्ट
  • मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही
  • सरकारी कार्यक्रमात आमदारपुत्राचा प्रचार? उमरग्यातील बॅनरवरून वादाची चिन्ह
  • जंतर-मंतरवरील कथित लाठीचार्जचा बुलढाण्यात निषेध; रमाईच्या लेकींचे आंदोलन
  • बुलढाण्यात आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार?
  • सायली खरे यांचा सुरांनी दिला CJP आंदोलनाला पाठिंबा!

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

मंत्री संजय राठोड

'जलसंधारण दिन' च्या निर्णयाबद्दल जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची आभार भेट; जलसंवर्धनावर सकारात्मक चर्चा

Minister Sanjay Rathod: मुंबई मलबार हिल येथील शिवनेरी शासकीय निवासस्थानी 'वसंत विचारधारा मंच'च्या शिष्टमंडळाने राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड यांची आभार आणि धन्यवादपर भेट घेतली.


जलसंधारण दिन च्या निर्णयाबद्दल जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची आभार भेट जलसंवर्धनावर सकारात्मक चर्चा

Minister Sanjay Rathod |

मानोरा (Minister Sanjay Rathod) : मुंबई मलबार हिल येथील शिवनेरी शासकीय निवासस्थानी 'वसंत विचारधारा मंच'च्या शिष्टमंडळाने राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड यांची आभार आणि धन्यवादपर भेट घेतली. यावेळी वसंत विचारधारा मंच ने मागील ७-८ वर्षापासून केलेल्या प्रदीर्घ संघर्ष आणि पाठपुराव्यानंतर 'जलसंधारणाचे प्रणेते' माजी मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक यांच्या जयंतीदिनी, २१ ऑगस्ट रोजी 'जलसंधारण दिन' साजरा करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल (Minister Sanjay Rathod) मंत्री संजय राठोड यांचे आभार मानण्यात आले.

भेटीदरम्यान राज्यभर जलसंधारण, जलसाक्षरता आणि 'पाणी आडवा, पाणी जिरवा' या राज्याचे माजी मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक यांच्या पाणी बचतीच्या विचारांचा व्यापक प्रसार करण्यासाठी प्रत्येक शासकीय स्तरावर विविध उपक्रम राबविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. जलसंधारणाच्या चळवळीला अधिक बळ देण्यासाठी शासन व सामाजिक संस्थांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. या प्रसंगी 'वसंत विचारधारा मंच' च्या शिष्टमंडळाने मंत्री संजय राठोड (Minister Sanjay Rathod) यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.