Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

देशी दारूचा साठा जप्त

कुरुंदा येथे 81 हजारांचा देशी दारूचा साठा जप्त; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

country liquor seized: महाराष्ट्रातील कुरुंद्यात एक तरुणाला पोलिसांनी बेकायदेशीरदेशी दारूच्या बाटलांचा साठा जप्त करून पकडले. 81,520 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


कुरुंदा येथे 81 हजारांचा देशी दारूचा साठा जप्त तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

country liquor seized |

कुरुंदा (country liquor seized) : वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे बेकायदा देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या कारवाईत 81,520 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

कुरुंदा पोलीस ठाण्याचे पोउपनि हनुमंत गंगाराम धुतुरे यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. 16 जून रोजी दुपारी 3:30 वाजता गणेश नगर, कुरुंदा येथील बौद्ध विहारा शेजारील सार्वजनिक रोडवर आरोपी देवानंद सुभाष गाडे, रा. साठे नगर, कुरुंदा याला संशयास्पदरीत्या स्कुटीवरून जाताना थांबवण्यात आले. तपासणी दरम्यान त्याच्याकडे विनापरवाना देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या.

जप्त केलेल्या मालामध्ये पाच खाकी बॉक्समध्ये 90 एम.एल.च्या 500 प्लास्टिक बाटल्या, ज्यांची किंमत 20,000 रुपये आहे, तसेच तीन बॉक्समध्ये 180 एम.एल.च्या 144 काचेच्या बाटल्या, ज्यांची किंमत 11,520 रुपये आहे. यांचा समावेश आहे. याशिवाय गुन्ह्यात स्कुटी, क्रमांक एम.एच. 38 ए.एम. 2001, अंदाजे 50,000 रुपये किमतीची देखील जप्त करण्यात आली. एकूण 81,520 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

आरोपी स्वतःच्या फायद्यासाठी अवैधरित्या चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने हा माल वाहतूक करत होता. या (country liquor seized) प्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास  पाईकराव व  सवंडकर करीत आहेत.