Breaking News
  • केवळ चाकणकरांवर कारवाई का? खऱ्या सूत्रधारांना का वाचवताय? – नाना पटोलेंचा रोकठोक सवाल
  • राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते हेल्मेट न घालता चार्जिंग स्कूटीवरून कलेक्टर ऑफिसला पोहचले
  • पुण्यातील सर्व VIP, VVIP ची ताफ्यातील वाहने अर्ध्याने कमी करण्यात आली आहेत
  • सोलापूर - अक्कलकोट शहरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा 22 गाड्यांचा ताफा
  • सोलापूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात स्वामींचे मनोभावे घेतले दर्शन
  • फडणवीसांचा दुचाकी प्रवासाने वेधले लक्ष; शेलार-परब संवादावर मिश्किल व्हिडिओ व्हायरल
  • देवास येथील एका कारखान्यात जोरदार स्फोट झाला असून या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.
  • आम्ही बोलायला लागलो की,तुमची अडचण होईल; मंत्री चंद्रकांत पाटलांचा आमदार जयंत पाटलांना इशारा
  • मंत्री नितेश राणे, आदिती तटकरे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

ज्ञानेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय, मांडवाचा बारावी परीक्षेत झेंडा; विज्ञान शाखेचा निकाल ९८.७२ टक्के

फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून मांडवा येथील ज्ञानेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाने यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.


ज्ञानेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय मांडवाचा बारावी परीक्षेत झेंडा विज्ञान शाखेचा निकाल ९८७२ टक्के

Maharashtra HSC Result 2026 |

रिसोड (Maharashtra HSC Result 2026) : फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, मांडवा येथील ज्ञानेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाने आपली उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही कायम राखली आहे. विद्यालयाच्या विज्ञान शाखेने ९८.७२ टक्के, तर कला शाखेने ८२.९५ टक्के निकाल नोंदवून घवघवीत यश संपादन केले आहे.

​विज्ञान शाखेत सृष्टी बोराडे प्रथम

​विज्ञान शाखेतून एकूण २३६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी २३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये सृष्टी विष्णू बोराडे हिने ५४६ गुण (९१%) मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. आयुर रामानंद गट्टानी ५४३ गुणांसह (९०.५०%) द्वितीय, तर कु. सिद्धी सचिन तापडिया ५४० गुणांसह (९०%) तृतीय आली आहे. विशेष म्हणजे, या शाखेतील १४६ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवून 'विशेष प्राविण्य' श्रेणी प्राप्त केली आहे.

​कला शाखेत सानिका मुटकुळेची बाजी

​कला शाखेतून ८८ पैकी ७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात कु. सानिका आत्माराम मुटकुळे ४७० गुणांसह (७८.३३%) प्रथम, कु. सीमा सुभाष गाडगीळ ४६५ गुणांसह (७७.५०%) द्वितीय, तर कु. अश्विनी वेंकट चव्हाण ४५३ गुणांसह (७५.५०%) तृतीय आली आहे. कला शाखेतून ५० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

​यशाचे सर्वत्र कौतुक

​विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव लक्ष्मणरावजी कायंदे व अध्यक्ष अविनाशजी कायंदे यांनी सर्व गुणवंतांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्राचार्य भागवत घुगे यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय विद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना दिले आहे. या यशाबद्दल परिसरातून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related to this topic: