Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

क्रांतिकारी शेतकरी संघटना

'मांजरा'च्या निर्णयाचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून जोरदार स्वागत!

Revolutionary Farmers' Organization: मंजरा सहकारी साखर कारखान्याच्या मंत्री दिलीपराव देशमुख यांच्यावर नेतृत्वात ऊसदर ३,१७७.६२ रुपये टन घोषित करून शेतकरांनी क्रांतिकारी स्वागत केली.


मांजराच्या निर्णयाचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून जोरदार स्वागत 

Revolutionary Farmers' Organization |

 

शेतकऱ्यांना प्रतिमेट्रिक टन ३,१७७.६२ रुपये इतका ऊस दर

लातूर (Revolutionary Farmers' Organization) : "बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले" या संतवचनाची प्रचिती पुन्हा एकदा विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आली आहे. माजी मंत्री तथा सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी गळीत हंगाम २०२५-२६ साठी जाहीर केलेल्या ऊसदरापेक्षाही अधिक दर दिल्याच्या निर्णयाचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेने जोरदार स्वागत केले आहे. कारखान्याने प्रतिमेट्रिक टन किमान ३,१५० रुपये ऊसदर जाहीर केला होता. मात्र अंतिम हिशोबानुसार शेतकऱ्यांना प्रतिमेट्रिक टन ३,१७७.६२ रुपये इतका दर देण्यात आला आहे.

विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडून गाळपास आलेल्या उसाला प्रतिमेट्रिक टन ३,१७७.६२ रुपये दराने अंतिम ऊसबिल ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात शेतकरी हिताचे निर्णय घेण्याची परंपरा जपणारे दिलीपराव देशमुख यांनी सहकारी साखर कारखाना, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून नेहमीच शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. याच भूमिकेचा प्रत्यय पुन्हा एकदा ऊसबिलाच्या माध्यमातून आल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

राज्यातीलच नव्हे, तर देशपातळीवर नावलौकिक मिळवलेल्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम कारखान्याचे चेअरमन तथा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला. हंगाम सुरू होण्यापूर्वी त्यांनी प्रतिमेट्रिक टन किमान ३,१५० रुपये ऊसदर जाहीर केला होता. मात्र अंतिम हिशोबानुसार शेतकऱ्यांना प्रतिमेट्रिक टन ३,१७७.६२ रुपये इतका दर देण्यात आला असून जाहीर केलेल्या दरापेक्षाही अधिक रक्कम अदा करण्यात आली आहे.

या निर्णयाचे स्वागत करत (Revolutionary Farmers' Organization) क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र मोरे यांनी दिलीपराव देशमुख यांचे आभार मानले आहेत. "बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले" या उक्तीप्रमाणे सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी दिलेला शब्द पूर्ण करून दाखवला आहे. ऊस उत्पादक शेतकरी, सभासद आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या हिताला प्राधान्य देत त्यांनी नेहमीच निर्णय घेतले आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले असून, हा ऊसदर त्याच शेतकरीहिताच्या भूमिकेचा भाग असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा निर्णय सहकार क्षेत्रातील आदर्श पाऊल मानला जात असून, मांजरा परिवाराने पुन्हा एकदा शेतकरीहिताला सर्वोच्च प्राधान्य देत विश्वासाची परंपरा कायम राखल्याची प्रतिक्रिया क्रांतिकारी शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे, कार्याध्यक्ष सत्तार पटेल, जिल्हाध्यक्ष अरुण दादा कुलकर्णी, प्रज्योत हुडे यांच्यासह शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण २२७ कोटी ३२ लाख ९७ हजार ९४६ रुपये इतकी रक्कम वर्ग केली आहे. त्यामुळे ऊस पुरवठादार शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून कारखान्याच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Related to this topic: