Breaking News
  • मीटर तपासणीसाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण, संगमनेरमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल
  • धाराशिवमध्ये 4 गावातील मराठा समाजाचे गावकरी आक्रमक,रास्ता रोको आंदोलन
  • पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या
  • आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी
  • मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट, नशिराबादेत चेन्नई सायबर क्राईमची धडक!
  • लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड
  • नंदुरबारमध्ये 93 लाखांचा 186 किलो गांजा जप्त
  • OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत
  • माकडांमुळे शाळा बंद, विद्यार्थी व शिक्षक शाळा सोडून पळाले

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

शक्तीपीठ महामार्ग

शक्तीपीठ महामार्गाला विरोध; संतप्त शेतकर्‍यांनी पालकमंत्र्यांना विचारला जाब

Shaktipeeth Expressway: जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्गा करीता अनेक शेतकर्‍यांची शेती जाणार आहे. या शक्तीपीठ महामार्गाला संघर्ष समितीकडून विरोध होत आहे.


शक्तीपीठ महामार्गाला विरोध संतप्त शेतकर्‍यांनी पालकमंत्र्यांना विचारला जाब

Shaktipeeth Expressway |

हिंगोली (Shaktipeeth Expressway) : जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्गा करीता अनेक शेतकर्‍यांची शेती जाणार आहे. या शक्तीपीठ महामार्गाला संघर्ष समितीकडून विरोध होत आहे. १५ ऑगस्टला पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागाची बैठक डिपीटीसी सभागृहात घेण्यात आली. या सभागृहात शक्तीपीठ महामार्गाला  विरोध करणार्‍या शेतकर्‍यांनी शिरकाव केला. यावेळी पालकमंत्र्यांना त्यांनी धारेवर धरून चोरीछुपे मार्गाने सुरू असलेले हे काम तात्काळ बंद करावे अशी मागणी केली. 

१५ ऑगस्टला घेण्यात आलेल्या बैठकीत पालकमंत्री नरहरी झिरवाळ, खा. रामराव वडकुते, खा. नागेश पाटील आष्टीकर, आ. संतोष बांगर, आ. राजूभैय्या नवघरे, आ. डॉ. प्रज्ञा सातव यांच्यासह जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. श्रेणिक लोढा, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, जिल्हा शल्यचिकित्सक नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी वैâलास शेळके, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता चक्रधर मुंगल आदींची उपस्थिती होती. बैठकीमध्ये प्रारंभी आरोग्य विषयक बाबींचा सादर करण्यात आला.

ही बैठक शेवटच्या टप्यात पोहचली असता (Shaktipeeth Expressway) शक्तीपीठाला विरोध करणार्‍या शेतकर्‍यांनी डिपीटीसी सभागृहात शिरकाव केला. यावेळी शेतकर्‍यांनी शक्तीपीठ महामार्ग होऊ दिला जाणार नाही. अशा घोषणा देऊन पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. विशेष म्हणजे डिपीडीसी सभागृहात पोलिसांचा बंदोबस्त असुनही संतप्त शेतकरी पालकमंत्र्यांच्या व्यासपिठाकडे धाव घेऊ लागले. त्यामुळे या सभागृहात वातावरण चांगलेच गरम झाले होते. शक्तीपीठ महामार्गासाठी सुरू असलेली प्रक्रिया तात्काळ थांबवावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केली असता पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी शेतकर्‍यांच्या सहमतीनंतरच हे काम केले जाईल अशी ग्वाही दिली. त्यानंतर पालकमंत्र्यांना सभागृहातून पोलिस बंदोबस्तात जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात नेण्यात आले. 

पोलिस बंदोबस्त असतानाही शेतकर्‍यांचा शिरकाव
ह पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक डिपीडीसी सभागृहात होती. सभागृहात स्थानिक गुन्हे शाखेसह इतरांचा बंदोबस्त होता. परंतु बैठक सुरू असताना महामार्गाला विरोध करणारे शेतकरी सभागृहात येत असताना त्यांना प्रवेशव्दारावर का थांबवता आले नाही, असा प्रश्न सभागृहातील उपस्थित अधिकारी व कर्मचारी करू लागले.

Related to this topic: