Co-operative Bank Election: सहकार बँकेसाठी १९ जुलैला सुरू होणाऱ्या मतदानात परभणी जिल्ह्यातील १४ मतदान केंद्रांमधून एकूण १५०८ मतदारांपैकी १४३६ मतदारांनी मतदान केले.
१५०८ पैकी १४३६ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
आज जायकवाडी परिसरातील कल्याण मंडपममध्ये मतमोजणी
हिंगोली (Co-operative Bank Election) : दि. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीसाठी १९ जुलैला मतदानाची प्रक्रीया पार पडली. ज्यामध्ये एकुण १५०८ मतदारांपैकी १४३६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ज्याची ९५.२३ टक्केवारी आली आहे. आज २० जुलैला मतमोजणी होणार आहे.
दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Co-operative Bank Election)संचालक मंडळ निवडणूक २०२६ - ३१ साठी २१ संचालक आहेत. ज्यामध्ये १३ संचालक बिनविरोध निवडूण आले. ८ संचालक निवडीकरीता रविवारी १९ जुलैला सकाळी ८ ते दुपारी ४ दरम्यान हिंगोली व परभणी जिल्ह्यातील १४ मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रीया सुरळीत पार पडली. यामध्ये मतदान केंद्र निहाय एकुण मतदान, झालेले मतदान व मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे हिंगोली येथे एकुण १२७ पैकी १२५ मतदारांनी मतदान केले. ज्याची ९८.४३ टक्केवारी आहे. सेनगाव येथे एकुण १०८ पैकी ६२ मतदारांनी मतदान केले. ज्याची ५७.४१ टक्केवारी आहे. औंढा नागनाथ येथे एकुण ८२ पैकी ७९ मतदारांनी मतदान केले. ज्याची ९६.३४ टक्केवारी आहे. वसमत येथे एकुण १२५ पैकी १२४ मतदारांनी मतदान केले. ज्याची ९९.४१ टक्केवारी आहे. कळमनुरी येथे एकुण ९६ पैकी ९५ मतदारांनी मतदान केले. ज्याची ९८.९६ टक्केवारी आहे.

या सोबतच परभणी येथे एकुण ३२५ पैकी ३२१ मतदारांनी मतदान (Co-operative Bank Election) केले. ज्याची ९८.७७ टक्केवारी आहे. जिंतूर येथे एकुण ११५ पैकी ११० मतदारांनी मतदान केले. ज्याची ९५.६५ टक्केवारी आहे. सेलू येथे एकुण ८४ पैकी ८३ मतदारांनी मतदान केले. ज्याची ९८.८१ टक्केवारी आहे. पाथरी येथे एकुण ४९ पैकी ४५ मतदारांनी मतदान केले. ज्याची ९१.८४ टक्केवारी आहे. मानवत येथे एकुण ६२ पैकी ६१ मतदारांनी मतदान केले. ज्याची १०० टक्केवारी आहे.

सोनपेठ येथे एकुण ४० पैकी ४० मतदारांनी मतदान केले. ज्याची १०० टक्केवारी आहे. गंगाखेड येथे एकुण १०१ पैकी १०१ मतदारांनी मतदान केले. ज्याची १०० टक्केवारी आहे. पालम येथे एकुण ८२ पैकी ७९ मतदारांनी मतदान केले. ज्याची ९६.३४ टक्केवारी आहे. पुर्णा येथे एकुण ११२ पैकी ११० मतदारांनी मतदान केले. ज्याची ९८. २१ टक्केवारी आहे. हिंगोली - परभणी जिल्ह्यात एकुण १५०८ मतदार होते. ज्यामध्ये १४३६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ज्याची ९५.२३ टक्केवारी झाली आहे.