Breaking News
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
  • मुक्ताईनगरात दोन गुटखा तस्कर जेरबंद, वाहन जप्त
  • नाशिकला पुढील 3 दिवसाचा पावसाचा यलो अलर्ट
  • मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही
  • सरकारी कार्यक्रमात आमदारपुत्राचा प्रचार? उमरग्यातील बॅनरवरून वादाची चिन्ह
  • जंतर-मंतरवरील कथित लाठीचार्जचा बुलढाण्यात निषेध; रमाईच्या लेकींचे आंदोलन
  • बुलढाण्यात आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार?
  • सायली खरे यांचा सुरांनी दिला CJP आंदोलनाला पाठिंबा!

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

अंगणवाडी सेविका

अंगणवाडी सेविकांना बी.एल.ओ. कामाची सक्ती थांबली; महासंघाच्या पाठपुराव्याला यश

Anganwadi Sevika: महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश, अंगणवाडी सेविकांवर बूथ लेव्हल ऑफिसरचे काम सोपवले जाणार नाही


अंगणवाडी सेविकांना बीएलओ कामाची सक्ती थांबली महासंघाच्या पाठपुराव्याला यश

Anganwadi Sevika |

हिंगोली (Anganwadi Sevika) : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून राज्यातील अंगणवाडी सेविकांवर बी.एल.ओ. म्हणजेच बूथ लेव्हल ऑफिसरचे काम सोपवले जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका राज्य प्रशासनाने घेतली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्याच्या आयुक्त मा. माधुरी सरदेशमुख यांनी याबाबत मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांना अधिकृत पत्र पाठवून अंगणवाडी सेविकांना बी.एल.ओ. कामापासून दूर ठेवण्याची विनंती केली आहे.

महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख यांनी या प्रश्नावर आयुक्तांकडे लेखी निवेदन देऊन सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याच परिणाम म्हणून प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलले आहे. हिंगोली जिल्हा दौऱ्या दरम्यान प्रदेशाध्यक्ष देशमुख यांनी जिल्हाधिकारी  राहुल गुप्ता यांची भेट घेऊन बी.एल.ओ. कामामुळे (Anganwadi Sevika) अंगणवाडी सेविकांवर येणाऱ्या अतिरिक्त ताणाबाबत सविस्तर चर्चा केली. याचवेळी कळमनुरी आणि आखाडा बाळापूर प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांना आयसीडीएस कार्यालयाकडून बी.एल.ओ. कामासंदर्भात देण्यात आलेल्या नोटीसांबाबत त्यांनी थेट आयसीडीएस कार्यालयाला भेट देऊन जाब विचारला.

या बैठकीत दोन्ही प्रकल्पांच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी यापुढे आयसीडीएस विभागामार्फत अंगणवाडी सेविकांना बी.एल.ओ. कामासंदर्भात कोणत्याही प्रकारच्या नोटीस देण्यात येणार नसल्याचे लेखी आश्वासन दिले. या चर्चेदरम्यान राज्य संघटक दत्ता देशमुख, हिंगोली जिल्हाध्यक्ष सिंधुताई ठाकूर आणि जिल्हा संघटक नेताजी धुमाळ उपस्थित होते.

या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना आवाहन केले आहे की, कोणत्याही दबावाला किंवा अफवांना बळी पडून घाबरून जाऊन बी.एल.ओ. चे काम करू नये. आपल्या हक्कांसाठी महासंघ ठामपणे पाठीशी उभा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Related to this topic: