Gudi Padwa: आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथाची गुढीपाडव्यानिमित्त (Gudi Padwa) दिनांक 19 मार्च रोजी सायंकाळी साडेचार वाजता विविध सुवर्ण आभूषणे घालून विशेष अलंकार महापूजा करण्यात आली होती.
औंढा नागनाथ (Gudi Padwa) : येथील आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथाची गुढीपाडव्यानिमित्त (Gudi Padwa) दिनांक 19 मार्च रोजी सायंकाळी साडेचार वाजता विविध सुवर्ण आभूषणे घालून विशेष अलंकार महापूजा करण्यात आली होती. यावेळी केशर आंब्याची श्री नागनाथ आरास करण्यात आली.
श्री नागनाथास सोन्याची साखळी, सोन्याचा कंठा, पिंपळपान,सुवर्णकडी, पुतळ्याची माळ, सुवर्णा चौघडे, सोन्याचे गोप, यासह विविध आभूषणे घालून ही पूजा सजवण्यात आली होती यावेळी गुढीपाडव्याच्या (Gudi Padwa) मुहूर्तावर माजी नगराध्यक्ष जयाताई अनिल देशमुख यांच्या शेतातील केसर आंब्याची श्री नागनाथाच्या पिंडीस आरास करण्यात आली होती. मंदिराचे मुख्य पुजारी बंडू उर्फ हरिहर भोपी, पुजारी नागेश क्षीरसागर, रामेश्वर गुरव, अभिषेक गोरे, मंगेश गुरव, प्रतीक गोरे, देवा देशमुख, प्रतिक कोळी, माजी सभापती अनिल देशमुख, सुरक्षा प्रमुख बबन सोनूणे यांनी पूजा सजवली होती.
दरम्यान श्री नागनाथाच्या या मनमोहक रूपाचे दर्शन घेण्यासाठी जिल्हा सहकारी जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते भाविकांची गर्दी पाहता मंदिर संस्था सल्लागार समितीचे अध्यक्ष आमदार संतोष बांगर, मंदिराचे अध्यक्ष तहसीलदार हरीश गाडे, अधीक्षक वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ, सुरक्षा प्रमुख बबन सोनूणे, यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप जोशी, नागेश माने, जगदेव दिंडे, नामदेव पाटील, मुकेश पडोळे, सचिन सोनटक्के, देवा देशमुख, संजय मोरे, मंचक सोळंके, गणेश जगताप, भगवान शिंदे, गणेश उदगिरे, दीपक रणखांबे यांनी बंदोबस्त ठेवला होता.