Dr. Babasaheb Ambedkar: लातूरमध्ये महाड चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विनोदभाऊ खटके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला गेला.
Dr. Babasaheb Ambedkar |
लातूर (Dr. Babasaheb Ambedkar) : महाड चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्याला संस्थापक अध्यक्ष विनोदभाऊ खटके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून येथील व्ही. एस. पँथर्स युवा संघटनेच्या वतीने शुक्रवारी (दि.२०) अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना विनोदभाऊ खटके म्हणाले की, वंदनीय बाबासाहेबांनी शोषित पिडीत वंचित माणसाच्या न्याय हक्कासाठी जीवनभर संघर्ष केला. त्यामुळे आज आपण चांगले जीवन जगत आहोत. बाबासाहेबांचे (Dr. Babasaheb Ambedkar) कार्य हे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे, यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे सांगितले. यावेळी संघटनेचे संपर्कप्रमुख आनंद जाधव, मार्गदर्शक रवी कुरील, जिल्हा कार्याध्यक्ष अकबर शेख, विद्यार्थी आघाडी मराठवाडा अध्यक्ष इंजि प्रीतम दंडे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष स्वप्निल कांबळे, ग्रुप जिल्हाध्यक्ष अजय सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष आबासाहेब गायकवाड, कामगार आघाडी शहर उपाध्यक्ष युनूस शेख, जिल्हा संघटक सूरज सूर्यवंशी, जिल्हा कार्याध्यक्ष वि.आ. नवनाथ शेंडगे, महादेव कांबळे, सूरज कांबळे, रोहित दंडे, रितेश जांभळे, सुबोध महाळंगीकर, सुजित कांबळे, व्यंकटेश चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.