Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

डॉक्टर असोसिएशन

औंढा नागनाथ डॉक्टर असोसिएशनकडून नगरपंचायतीला निवेदन

Aundha Nagnath Doctors Association: औंढा नागनाथ नगरपंचायत हद्दीत डॉक्टर असोसिएशनने खुली जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली, जेणेकरून ते विविध सामाजिक उपक्रमांसाठी स्वतंत्र इमारत उभारू शकतील.


औंढा नागनाथ डॉक्टर असोसिएशनकडून नगरपंचायतीला निवेदन

Aundha Nagnath Doctors Association |

नगरपंचायत हद्दीत खुली जागा उपलब्ध करून देण्याची मागणी

औंढा नागनाथ (Aundha Nagnath Doctors Association) : तालुक्यातील डॉक्टर असोसिएशनच्या वतीने आज औंढा नागनाथ नगरपंचायतीला नगराध्यक्ष कपिल खंदारे यांना लेखी निवेदन देण्यात आले. नगरपंचायत हद्दीतील खुली जागा उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, औंढा नागनाथ वैद्यकीय असोसिएशन ही नोंदणीकृत संस्था असून ती सामाजिक आरोग्यविषयक तसेच विविध सामाजिक उपक्रम नियमित राबवत असते. या उपक्रमांसाठी स्वतंत्र इमारत असणे आवश्यक असल्याने नगरपंचायत हद्दीतील प्लॉटिंगमधील नगरपंचायतीच्या मालकीची खुली जागा संस्थेला देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी सुमारे 30 बाय 40 स्क्वेअर फूट जागा देण्याची विनंती करण्यात आली.

या निवेदनावर (Aundha Nagnath Doctors Association) असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विलास खरात, कार्याध्यक्ष मुकेश पवार, उपाध्यक्ष डॉ. सुरेश गंगावणे, डॉ. सीमा देशपांडे, सचिव डॉ. हरीश  डॉ. दत्तराव सावळे, कोषाध्यक्ष डॉ. प्रवीण सोनी यांच्यासह डॉ. भिकूलाल अग्रवाल, डॉ. पांडुरंग राठोड, डॉ. रघुनाथ बेंगाळ, डॉ. नवनाथ कुटे, डॉ. शिवशंकर राठोड, डॉ. अभिषेक जयस्वाल, डॉ. विमलकुमार बोरा, डॉ. सत्यनारायण अग्रवाल, डॉ. नागनाथ मस्के, डॉ. नागेश उदगीरे, डॉ. नारायण काचगुंडे, डॉ. उद्धव सोळंके, डॉ. रामप्रसाद काचगुंडे  यांच्यासह आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. निवेदन देताना सर्व डॉ पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Related to this topic: