Anganwadi Bharti Scam: मानोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मौजे रोहणा येथील अंगणवाडी क्र. २ मधील मदतनीस पदाची भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
गटविकास अधिकाऱ्यांना लेखी निवेदन
१५ जुलैपर्यंत नियुक्ती न दिल्यास आंदोलनाचा इशारा
मानोरा (Anganwadi Bharti Scam) : मानोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मौजे रोहणा येथील अंगणवाडी क्र. २ मधील मदतनीस पदाची भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पात्र असूनही नियुक्ती न देता संबंधित अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत रोहणा येथील लक्ष्मी धनंजय भोंगुळ यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती मानोरा यांना दि. २ जुलै रोजी लेखी निवेदन सादर केले आहे.
निवेदनात लक्ष्मी भोंगुळ यांनी म्हटले आहे की, अंगणवाडी क्र. 2 मदतनीस पदी त्या पात्र उमेदवार असूनही एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी मानोरा नियुक्ती आदेश देण्यास टाळाटाळ करत आहेत. तत्कालीन बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद वाशीमच्या सामान्य प्रशासन विभागाने दि. २३ जून २०२६ रोजी दाखवा नोटीस बजावली होती, तरीही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. प्रशासकीय अधिकारी यांनी मानोरा येथून बदली झाल्यानंतर दुसरीकडे पलायन केल्याने संपूर्ण भरती प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप त्यांनी केला.
त्यामुळे एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाची मागील ३० ते ३५ वर्षांपासूनची चौकशी SIT मार्फत करावी, (Anganwadi Bharti Scam) जेणेकरून बोगस उमेदवार व बोगस अधिकारी खोटे नोटे काम करणार नाहीत आणि उमेदवारांकडून आर्थिक पैशाची देवाणघेवाण थांबेल, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. ३० जानेवारी २०२५ च्या प्रतिज्ञा व किशोर गायकवाड यांच्या नियुक्ती आदेशापासून आपल्याला लवकरात लवकर नियुक्ती आदेश द्यावा, अशी मागणी लक्ष्मी भोंगुळ यांनी केली आहे.
प्रशासकीय यंत्रणेकडून मानसिक व आर्थिक छळ होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. येत्या १५ जुलै पर्यंत नियुक्ती आदेश न मिळाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला असून दोषींवर भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २३६, २३७, २२९ (२ ) नुसार कडक कारवाई करावी, अशी विनंती त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना केली आहे. निवेदनाच्या प्रती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे व जिल्हाधिकारी वाशीम यांना देखील पाठवण्यात आल्या आहेत.