Breaking News
  • वर्धा नदीत पाच मुले बुडाली, एकाचा मृतदेह सापडला
  • पुणे विषारी दारू प्रकरण: राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

दारू पोलीस कारवाई

जवळाबाजारात हातभट्टी दारूवर पोलीस व उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त धडक कारवाई

Liquor police action: औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील पारधी वाडा भागात सडक्या रसायनापासून हातभट्टी दारू गाळली जात असल्याच्या गुप्त माहितीवरून औंढा नागनाथ पोलीस


जवळाबाजारात हातभट्टी दारूवर पोलीस व उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त धडक कारवाई  

Liquor police action |

जवळा बाजार (Liquor police action) : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील पारधी वाडा भागात सडक्या रसायनापासून हातभट्टी दारू गाळली जात असल्याच्या गुप्त माहितीवरून औंढा नागनाथ पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभाग हिंगोली यांच्या संयुक्त पथकाने आज सकाळी साडेसात वाजता अचानक छापा टाकला. या कारवाईत एकूण ९० लिटर सडके रसायन जप्त करून नष्ट करण्यात आले असून, त्याची अंदाजे किंमत ९ हजार रुपये आहे.  

पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक जी.एस. राहिरे, पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दूस, जमादार दिलीप नाईक, अमलदार अंबादास बेले, अनिल नागुलकर, विजय कालवे, राजकुमार कुटे, गारोळे तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक मोहन मातकर, ज्योती गूठे, के.जी. पुरी, ताहेर शेख, राठोड, जाधव, शिंदे यांचे पथक गुटखा व अमली पदार्थ विरोधी मोहीम राबवत होते. दरम्यान जवळाबाजार येथे काही महिला हातभट्टी दारू तयार करत असल्याची माहिती मिळाली. 

पथकाने पाहणी केली असता दोन वेगवेगळ्या ठिकाणी घराच्या कोपऱ्यात जमिनीत पुरलेल्या प्लास्टिक टाक्यांमध्ये ४० लिटर व ५० लिटर आंबट वासाचे सडके रसायन भिजत घातलेले आढळले. पंचांसमक्ष पंचनामा करून नमुने घेतल्यानंतर सर्व रसायन जागीच नष्ट करण्यात आले. मानवी शरीरास अपायकारक व जीवितास धोका निर्माण करणारे मिश्रण करून दारू गाळली जात होती. 

पोलीस येताच आरोपी महिला पळून गेल्या. या (Liquor police action) प्रकरणी पोलीस जमादार दिलीप नाईक यांच्या फिर्यादीवरून पार्वती देवसिंग काळे, पूजा दीपक काळे व दुष्काळबाई बंडू चव्हाण या तिघींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार दिलीप नाईक करीत आहेत. या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.