Mass wedding ceremony: लातूरात व्ही.एस. पॅंथर्सच्या आयोजनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ३५ वधू-वरांचा सामूहिक विवाह सोहळा होणार. विविध समाजातील लोक उपस्थित राहणार.
व्ही. एस. पॅंथर्सचे संस्थापक अध्यक्ष विनोद खटके यांची माहिती : रविवारी होणार विवाह सोहळा
लातूर (Mass wedding ceremony) : व्ही.एस. पॅंथर्स युवा संघटन महाराष्ट्र राज्यच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून लातुरात येत्या रविवारी (दि. १० मे २०२६ रोजी) आयोजित करण्यात आलेल्या सातव्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. या सोहळ्यासाठी ३५ वधू-वरांची नोंदणी झाल्याची माहिती व्ही.एस. पॅंथर्सचे संस्थापक अध्यक्ष विनोद खटके यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. हा विवाह सोहळा लातूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कच्या भव्य मैदानावर रविवारी सायंकाळी आठ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
आपणही समाजाचे काही देणे लागतो, या भावनेने प्रेरित होऊन मागच्या सलग सात वर्षांपासून अशा प्रकारच्या (Mass wedding ceremony) सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. आतापर्यंत २०० ते २२५ सर्वधर्मीय सामूहिक विवाह या सोहळ्यामध्ये पार पडल्याचे यावेळी बोलताना विनोद खटके यांनी सांगितले.
यावर्षीच्या विवाह सोहळ्यात (Mass wedding ceremony) एकूण ३५ वधू-वरांचे विवाह लावून दिले जाणार आहेत. यामध्ये मुस्लिम दोन, बौद्ध १८ तर हिंदू समाजातील १५ वधू-वरांचा समावेश आहे. वधू-वरांना मणी मंगळसूत्र, विवाहाच्या पेहरावांसह संसारोपयोगी वस्तूंचे देण्यात येणार असल्याचे विनोद खटके यांनी सांगितले. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले असून या समित्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यास लातूरकरांनी उपस्थित राहून वधू -वरांना शुभाशीर्वाद द्यावेत, असे आवाहन विनोद खटके यांनी यावेळी केले. या पत्रकार परिषदेला संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन मस्के, रवी कुरील, निलेश कांबळे, प्रितम दंडे, अॅड. किरण पायाळ, असद शेख, आनंद जाधव यांसह मान्यवर उपस्थित होते.
मान्यवर निमंत्रित...मंत्र्यांसह लोकप्रतिनिधी व मान्यवरांना निमंत्रण...
सोहळ्यासाठी सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाठ, लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खा. डॉ. शिवाजीराव काळगे, एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींनाही निमंत्रित करण्यात आले आहे. या सर्वधर्मीय विवाह सोहळ्यास हजारोंच्या संख्येने वऱ्हाडी मंडळी उपस्थित राहणार असून त्या सर्वांच्या सुरुची भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी येणाऱ्या वऱ्हाडींच्या वाहन पार्किंगची व्यवस्था जुन्या रेल्वे लाईनलगतच्या विलासराव देशमुख सत्याच्या बाजूने करण्यात आली आहे. वाहतुकीचा खोळंबा होणार नाही, यासाठी आमचे स्वयंसेवक दक्ष राहतील, असेही खटके यावेळी म्हणाले.