Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

शिवराज पाटील चाकूरकर स्मारक

चाकूरकरांच्या स्मारकासह सर्व विषय बहुमताने मंजूर!

Shivraj Patil Chakurkar Memorial: माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्मारकाच्या विषयासह विषय पत्रिकेवरील 28 विषय बहुमताने मंजुरी देत सत्ताधाऱ्यांनी पुन्हा एकदा विकास काम..


चाकूरकरांच्या स्मारकासह सर्व विषय बहुमताने मंजूर

Shivraj Patil Chakurkar Memorial |

 

लातूर महापालिका सभेत सत्ताधाऱ्यांचा षटकार! भाजपने नोंदविला काँग्रेसच्या भूमिकेचा अधिकार! 

महादेव कुंभार 
लातूर (Shivraj Patil Chakurkar Memorial) :
माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्मारकाच्या विषयासह विषय पत्रिकेवरील 28 विषय बहुमताने मंजुरी देत सत्ताधाऱ्यांनी पुन्हा एकदा विकास कामांच्या निर्णयाचा षटकार ठोकला! काँग्रेसचे गटनेते एडवोकेट दीपक सूळ यांनी 'विषय पत्रिकेवरील एक ते 28 विषय', असा उल्लेख करीत सर्व विषयांना हे सभागृह बहुमताने मंजुरी देत आहे, असे म्हटल्यानंतर अखेर सभागृहात हे विषय बहुमताने मंजूर करण्यात आले. दरम्यान भाजपाने काँग्रेसच्या या भूमिकेचा धिक्कार नोंदविला.

लातूर शहरातील प्रभाग क्रमांक 16 मध्ये कार्तिक भरत कांबळे (वय 7 वर्षे) व दिव्या नवनाथ उबाळे (वय 8 वर्षे) या दोन लहान बालकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने या मुलांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करीत कुटुंबातील सदस्याला महापालिकेत नोकरी द्यावी, असा मुद्दा नगरसेविका राजश्री धोत्रे यांनी उपस्थित केला होता. यावर चर्चा करताना सभागृहाचे काँग्रेस पक्ष नेते दीपक सूळ यांनी सभागृहातील सर्व सदस्यांची याबाबत एकच मागणी आहे, असे निदर्शनास आणून देत या विषयावर सर्वांचे एकमत आहे, असे म्हणत याबाबत सहमती दर्शविली असताना या चर्चेमध्ये सहभाग घेत नगरसेविका प्रेरणा होणारा यांनी बोलताना अचानकपणे 'कायदा बाजूला ठेवा!', असे वाक्य उच्चारल्याने सभागृहात गदारोळ झाला. यावर 'तुम्हाला संविधान मान्य नाही का?' असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक अमित लांडगे यांनी याबाबत होनराव यांनी माफी मागावी असे म्हणत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा दिला. अखेर या विषयावर गदारोळ निर्माण झाल्याने सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. 

तहकूब सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर रविशंकर जाधव यांनी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विजयी झालेले उमेदवार आमदार बसवराज पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यास नगरसेवक गिरीश पाटील यांनी अनुमोदन देताच सभागृहाने एकमताने हा ठराव मंजूर केला. स्थायी समितीचे सभापती तथा नगरसेवक सचिन बंडापल्ले यांनी माजी राज्यपाल डी. वाय. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्याचा विषय उपस्थित करून सभागृहाने श्रद्धांजली व्हावी, असा मुद्दा मांडला. सभागृहात दोन मिनिटे स्तब्धता बाळगून डी. वाय. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

आदर्श कॉलनी कुठून आली?- मठपतींचा सवाल!

लोकसभेचे माजी सभापती शिवराज पाटील चाकूरकर यांचे स्मारक (Shivraj Patil Chakurkar Memorial) लातूर महापालिका प्रांगणात उभारण्याचा शब्द देत मुख्यमंत्र्यांनी आर्थिक तरतुदीची घोषणा केली होती. मात्र चाकूरकरांच्या स्मारकाच्या विषयात आदर्श कॉलनी कुठून आली? असा सवाल करीत नगरसेवक दीपक मठपती यांनी लिंगायत समाजाबाबत काँग्रेसने दुजाभाव केल्याचा आरोप केला. राजीव गांधी चौकातही महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा हटविण्याचे षडयंत्र काँग्रेसने केल्याची टीका त्यांनी केली. यावेळी नगरसेविका शोभा पाटील यांनी शहर विकासासाठी सभागृह आहे. सभागृहामध्ये जाती धर्मावर बोलू नये, असे बजावले. 

औसा रोडला चाकूरकरांचे नाव देण्याची अंमलबजावणी का नाही? : गिरीष पाटील

गिरीष पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राजीव गांधी चौक या औसा रोडला माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे नाव देण्याचा विषय मागच्या सभेत मंजूर होऊनही त्याची अंमलबजावणी का केली जात नाही? असा प्रश्न उपस्थित केला. याच अनुषंगाने नगरसेविका स्वाती घोरपडे यांनी मागील सभेत आलेल्या विषयाबाबत अंमलबजावणीस प्रशासनाकडून टाळाटाळ होत असून 'सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीचे म्हणून घातक असते', असे सांगत महापौरांनी यावर बोलावे, अशी मागणी केली. मुदत संपलेले शहरातील युनिपोल्स व होर्डिंग्ज पंधरा दिवसात हटविण्याचा निर्णय १० मार्च रोजी झालेल्या सभेत झाला होता. त्याची अंमलबजावणी आज पर्यंत का केली नाही? याचा जाब महापौरांनी प्रशासनास विचारावा अशी मागणी केली.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष!

प्रभाग 16 मध्ये डबक्यात पडून मृत्यू झालेल्या दोन बालकांच्या कुटुंबीयांना मदत करावी या मागणीसाठी सभागृहातील चर्चेत भाग घेत बोलताना अचानकपणे 'कायदा बाजूला ठेवा', असे वाक्य भाजपाच्या नगरसेविका प्रेरणा होनराव यांनी उच्चारल्याने वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक अमित लांडगे तसेच काँग्रेसचे नगरसेवक अतिष यांनी सभागृहाचे तहकूब कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतरही 'तुम्हाला संविधान मान्य नाही का?' याबाबत होनराव यांनी सभागृहाची माफी मागावी हा मुद्दा उपस्थित करीत सभागृह चालू देणार नाही, असा इशारा दिला. या चर्चेत अखेर होनराव यांनी भाग घेत 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाची आण-बाण-शान राखण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत,' असे म्हटल्यानंतर सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करण्यात आला आणि सभागृहाचे कामकाज पुढे सुरू झाले.