Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

आयुक्त राहुल कुलकर्णी

लातूर पालिका आयुक्तपदी राहुल कुलकर्णी

Rahul Kulkarni: लातूर महानगरपालिकेने आयुक्तपदाची नोबती राहुल कुलकर्णी यांना देत आला. त्यांनी गुरुवारी पदभार घेऊन प्रस्थापना केली. लातूर शहराच्या आर्थिक संकट


लातूर पालिका आयुक्तपदी राहुल कुलकर्णी

Rahul Kulkarni |

लातूर (Rahul Kulkarni) : लातूर महानगरपालिकेच्या आयुक्त मानसी मीना यांच्या रजेमुळे रिक्त झालेल्या महापालिका आयुक्तपदी राज्य शासनाने आयएएस अधिकारी राहुल कुलकर्णी यांची नियुक्ती केली आहे. राहुल कुलकर्णी (Rahul Kulkarni) हे आपल्या पदाचा पदभार उद्या गुरुवारी येणार आहेत. लातूर महानगरपालिकेचे ते अठरावे आयुक्त आहेत. 

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी याबाबतचे पत्र जारी केले आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक असलेले कुलकर्णी यांच्या जागी आयएएस अधिकारी अशोक करंजकर यांची बदली करण्यात आल्याचे या पत्रात म्हटले आहे.

लातूर महानगरपालिका निर्माण झाल्यापासून आजपर्यंत फार कमी आयतानी आपला कार्यकाळ पूर्ण केला आहे. अल्पावधीतच अनेक आयुक्तांच्या बदल्या झाल्या आहेत. लातूर महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता येणाऱ्या आयुक्तांपुढे महापालिकेचा कारभार चालवण्याचे मोठे आव्हान आहे. या आठवड्यातच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दोन महिन्यांचे वेतन थकल्यामुळे आंदोलन केले होते. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे महापालिकेकडे कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पैसा नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. महापालिकेची विस्कटलेली आर्थिक घडी बसविण्यासाठी आयुक्त राहुल कुलकर्णी (Rahul Kulkarni) कशा पद्धतीने कारभार करतात, याकडे लातूर शहरवासी यांचे लक्ष लागले आहे.