Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

लातूर एमआयडीसी पोलीस

लातूर जिल्ह्यातून दोन सराईत गुन्हेगार हद्दपार; एमआयडीसी पोलीस ठाण्याची कारवाई

Latur MIDC Police: लातूर जिल्ह्यापासून दोन गुन्हेगारांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. त्यांनी वरील जिल्ह्यांमध्ये आपल्या कृत्यांचा पालन न करता, गुन्हे करत असल्यामुळे मातृकर्तव्यांवर दंडाधिकारी


लातूर जिल्ह्यातून दोन सराईत गुन्हेगार हद्दपार एमआयडीसी पोलीस ठाण्याची कारवाई

Latur MIDC Police |

लातूर (Latur MIDC Police) : वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ५६ (१) (ब) अन्वये एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. एमआयडीसी पोलीस ठाण्याने दिलेल्या प्रस्तावावर उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, लातूर रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी हद्दपारीचे आदेश पारित केले आहेत. अक्षय राजू कोंद्रे ऊर्फ जाधव (वय २४, रा. वैभव नगर, ह.मु. राजे शिवाजी नगर, लातूर) व करण पांडुरंग पवार (वय २४, रा. आयोध्या नगरी, भांबरी चौक, लातूर) अशी या गुन्हेगारांची नावे आहेत.

उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी त्यांना एक वर्षासाठी लातूर जिल्हा तसेच धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव व कळंब तालुका आणि बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुका या क्षेत्रातून हद्दपार करण्याचा आदेश दिला. आदेशानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याने तातडीने कारवाई करून दोन्ही हद्दपार आरोपींना निर्धारित क्षेत्राबाहेर काढले. पोलीस अंमलदार बी. आर. भोसले यांनी त्यांना बीड जिल्ह्यातील केज पोलीस ठाण्यात नियमानुसार हजर केले. हद्दपारीच्या कालावधीत ते केज येथे वास्तव्यास राहणार असून संबंधित पोलीस ठाण्याकडून त्यांच्या हालचालींवर नियमित देखरेख ठेवण्यात येणार आहे. तसेच शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना हद्दपार क्षेत्रात प्रवेश करता येणार नाही. आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

परिसरात दहशत...
चौकशीदरम्यान या दोघांविरुद्ध लातूर शहरातील एमआयडीसी व शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, मारहाण, दंगल, धमकी, सार्वजनिक शांततेचा भंग, मालमत्तेविरुद्धचे गुन्हे तसेच इतर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याविरुद्ध यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या होत्या. मात्र त्या कारवायांचा कोणताही परिणाम न होता त्यांनी सातत्याने गुन्हेगारी कृत्ये सुरूच ठेवली. त्यांच्या दहशतीमुळे परिसरातील नागरिक उघडपणे तक्रार देण्यास किंवा न्यायालयात साक्ष देण्यासही धजावत नसल्याचे गोपनीय चौकशीत समोर आले.

Related to this topic: