लातूर येथील व्ही. एस. पँथर्सच्या वतीने आयोजित ७ व्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात विशेष सत्कारमूर्ती म्हणून इंजि. अनिलकुमार गायकवाड उपस्थित होते.
लातूर (Latur Event) : लातूर येथील व्ही. एस. पँथर्सच्या वतीने आयोजित ७ व्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात विशेष सत्कारमूर्ती म्हणून इंजि. अनिलकुमार गायकवाड उपस्थित होते.
इंजिनियर अनिलकुमार गायकवाड हे लातूर जिल्ह्याचे भूमिपुत्र असून त्यांनी आपल्या कार्यातून लातूरचे नाव जागतिक स्तरावर पोहोचवले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी व्ही. एस. पँथर्स युवा संघटनेच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर, औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार, माजी खासदार सुनील गायकवाड, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, महापौर जयश्री सोनकांबळे, विरोधी पक्षनेते देविदास काळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, शहर पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे, अॅड. विनोद मुळे, अॅड. बळवंत जाधव, अॅड. बी. एल. शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद भाऊ खटके, प्रदेशाध्यक्ष तथा माजी नगरसेवक सचिन मस्के, संपर्कप्रमुख आनंद जाधव, मार्गदर्शक संतोष मांदळे, रवी कुरील, मराठवाडा अध्यक्ष निलेश कांबळे, विद्यार्थी आघाडी मराठवाडा अध्यक्ष प्रीतम दंडे, जिल्हाध्यक्ष शरद किनीकर, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष किरण पायाळ, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष स्वप्नील कांबळे, ऑटो युनियन जिल्हाध्यक्ष देवा गायकवाड, शहराध्यक्ष असद शेख, कामगार आघाडी शहराध्यक्ष गौस शेख, जिल्हा संघटक गोविंद कांबळे, सूरज सूर्यवंशी, अतुल होळकर, मनोज गायकवाड, साईनाथ कांबळे, शाहरुख मणियार, आबासाहेब गायकवाड, धनराज सुरवसे, संजीव सुरवसे, सुनील सातपुते, महेश कांबळे, प्रदीप गायकवाड, संतोष कांबळे, नारायण चव्हाण, यासिन शेख, रमजान शेख, अजय सूर्यवंशी, अॅड. रमक जोगदंड, असित कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.