शिरूर ताजबंद येथील लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतन शाखा इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते.
शिरूर ताजबंद शाखा इमारतीच्या भूमिपूजनावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे प्रतिपादन
लातूर : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची यशस्वी वाटचाल सुरू असून बँकेच्या कारभारात कधीही पक्षीय राजकारण केले नाही आणि भविष्यातही चुकीच्या पद्धतीने काम केले जाणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी केले. शिरूर ताजबंद येथील लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतन शाखा इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते.
शनिवारी पार पडलेल्या या कार्यक्रमात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते शिरूर ताजबंद शाखेच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच साहेबराव जाधव होते.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंदराव सुरवसे, समाज कल्याण विभाग सभापती उत्तमराव माने, उपनगराध्यक्ष अय्याजभाई शेख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड. प्रमोद जाधव, संचालक पृथ्वीराज शिरसाट, अशोकराव गोविंदपुरकर, व्यंकटराव बिरादार, मारोती पांडे, अनुप शेळके, संचालिका सौ. स्वयंप्रभा पाटील, सौ. अनिता केंद्रे, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक हणमंतराव जाधव, प्रदेश सरचिटणीस शिवानंद हेंगणे, बाजार समितीचे उपसभापती संजय पवार, तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, माजी उपनगराध्यक्ष मुजीब पटेल जहागीरदार, माजी सभापती चंद्रकांत मद्दे, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश बिल्लापट्टे, उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, सरपंच मच्छिंद्र वाघमारे, बालासाहेब पाटील आंबेगावकर, प्रताप पाटील, प्रकाश ससाने, संग्राम स्वामी, अफरोज शेख, अशिष तोगरे, बाबुराव उडतेवार, तुळशीराम भोसले, सुभाषराव गुंडरे, माधवराव स्वामी, विकास महाजन, राजकुमार सोमवंशी, रामप्रसाद जाजू, बालाजी कातकडे, बालाजी पाटील, युसुफभाई सय्यद, नामदेवराव विराळे, संचालक मंडळ, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांचे चेअरमन व संचालक, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, बँकेचे अधिकारी-कर्मचारी तसेच परिसरातील शेतकरी, खातेदार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, दहा गुंठे जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाही कर्ज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. शेतीसोबतच शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायासारख्या जोडधंद्याकडे वळल्यास आर्थिक प्रगती साधता येईल, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड. प्रमोद जाधव यांनी केले. त्यांनी बँकेच्या प्रगतीचा सविस्तर आढावा उपस्थितांसमोर मांडला. यावेळी ज्येष्ठ संचालक अशोक गोविंदपूरकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव माने यांनी केले.