Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

लातूर चेन स्नॅचिंग

महिलांचे हिसकावलेले १७ लाखांचे दागिने लातूरमध्ये जप्त!

Latur Chain Snatching: 'चेन स्नॅचिंग'च्या सात घटनांमध्ये अल्पवयीन बालकांनी महिलांच्या सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. पोलिसांनी येथून ₹१७ लाखांचे दागिने जप्त केले


महिलांचे हिसकावलेले १७ लाखांचे दागिने लातूरमध्ये जप्त

Latur Chain Snatching |

 

'चेन स्नॅचिंग'च्या सात गुन्ह्यांत बीड जिल्ह्यातील तीन विधी संघर्षग्रस्त बालके ताब्यात!

लातूर (Latur Chain Snatching) : लातूर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 'चेन स्नॅचिंग'च्या सात गुन्ह्यांचा एकाच वेळी उलगडा करत बीड जिल्ह्यातील तीन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. या प्रकरणात १७ लाख १० हजारांचे दागिने जप्त करण्यात आले. लातूर शहर व परिसरात मागील काही महिन्यांपासून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळून जाण्याच्या घटना घडत होत्या. अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशांवर अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेने मोहीम हाती घेतली होती. 

मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने जुना रेणापूर नाका ते पापविनाशी रोड परिसरात सापळा रचून संशयित अवस्थेत थांबलेल्या तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्यांनी लातूर शहरातील विविध भागांमध्ये महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याची कबुली दिली. पुढील तपासात त्यांनी आपल्या इतर साथीदारांसह नाईक चौक, अंबाजोगाई रोड, औसा रोड, बाभळगाव, एमआयडीसी परिसर तसेच शहरातील इतर भागांमध्ये अनेक चेन स्नॅचिंगच्या घटना केल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून विविध गुन्ह्यांतील चोरीस गेलेले सोन्याचे मिनी गंठण, काळ्या मण्यांसह मंगळसूत्राचे भाग असा एकूण दहा तोळे नऊ ग्राम वजनाचे दागिने तसेच गुन्हे करण्यासाठी वापरण्यात आलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल जप्त केली आहे. (Latur Chain Snatching) जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे ₹ १७,१०,००/- इतकी आहे. या तपासादरम्यान पोलीस स्टेशन शिवाजीनगर २ गुन्हे, पोलीस स्टेशन लातूर ग्रामीण – १ गुन्हा, पोलीस स्टेशन गांधी चौक – १ गुन्हा,  पोलीस स्टेशन एमआयडीसी – २ गुन्हे व पोलीस स्टेशन विवेकानंद चौक – १ गुन्हा, अशा एकूण चेन स्नॅचिंगच्या सात गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, पोलीस अंमलदार  युवराज गिरी, प्रदीप स्वामी, राजेश कंचे, मोहन सुरवसे संतोष खांडेकर, सिद्धेश्वर मदने,जगीर शेख, राहुल कांबळे, काकासाहेब बोचरे, हरी पतंगे, रामदास बाचीफळे यांनी पार पाडली.

Related to this topic: